शिवजयंतीनिमित्त राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय.. तीन दिवस टोलमाफी

पुणे : शिवजयंतीच्या (Shivjayanti) पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शिवभक्तांनी टोल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. 19 फेब्रुवारीला शिवनेरी वर जाणाऱ्या शिवभक्तांना टोलमाफ करण्यात आला आहे. शिवनेरी किल्ल्याच्या मार्गावरील तीन टोलवर टोलमाफी करण्यात आली आहे. (On the occasion of Shiv Jayanti, the state government took a big decision)

  खालापूर, तळेगाव, खेड, राजगुरुनगर टोलनाक्यावर टोलमाफी असेल सरकारकडून घोषित करण्यात आले आहे. (On the occasion of Shiv Jayanti, the state government took a big decision)

शिवनेरी किल्ल्यावर यावर्षी सरकारकडून शिवजंयती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक कार्यक्रमाचे आयोजन ही करण्यात आले आहे. त्यामुळेच शिवभक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याची शक्यता असून, सरकारने हा निर्णय घेतला आहे. यंदाची शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासोबतच महाराष्ट्रातील लोकसंस्कृती आणि महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. पर्यटन विभागामार्फत राज्यातील महत्वाच्या उपक्रमांचे पर्यटन वेळापत्रक बनविले आहे.

 

‘शिवकालीन गाव’ हे  महोत्सवाचे प्रमुख आकर्षण

किल्ले शिवनेरीवर होणाऱ्या या सोहळ्यानिमित्त जवळपास एक लाख शिवप्रेमी सहभागी होतील असे नियोजन महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आले आहे. किल्ले शिवनेरीवर जन्मोत्सव सोहळा साजरा करण्याबरोबरच किल्ल्याच्या पायथ्याजवळ जुन्नर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘शिवकालीन गाव’ हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असून या वर्षी प्रथमच ‘महाशिव आरती’चे आयोजन करण्यात आले आहे. (On the occasion of Shiv Jayanti, the state government took a big decision)

असे असतील कार्यक्रम

18 फेब्रुवारी
सायं. 6.30 वा. हिंदवी स्वराज्य महोत्सव 2023 उदघाटन .
सायं. 7 ते रात्री 10 वा. सुप्रसिद्ध दिग्दर्शक अशोक हांडे यांचा ‘मराठी बाणा’ कार्यक्रम.

19 फेब्रुवारी
स. 9 ते 11 वा. किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा
दु. 3 ते 5 वा. शिववंदना
सायं. 6.15 ते 7 वा. महाआरती कार्यक्रम
सायं. 7 ते रात्री 10 वा. जाणता राजा या महानाट्याचा कार्यक्रम

20 फेब्रुवारी
सायं.7 ते रात्री 10 वा. जाणता राजा कार्यक्रम

Local ad 1