ST News : आजपासून महिलांना बस प्रवासासाठी 50 टक्के सवलत लागू

ST News : राज्याच्या अर्थसंकल्पात (Maharashtra Budget) उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister, Finance Minister Devendra Fadnavis) यांनी अनेक घोषणा केल्या आहेत.त्यात एसटीमधून प्रवास (ST News) करणाऱ्या महिलांना प्रवास तिकिट दरात 50 टक्के सवलत देणार असल्याचे जाहीर केले होते. त्याचा आदेश जारी करण्यात आला. आजपासून (शुक्रवार)  एसटी महामंडळाच्या (ST Corporation) बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे.  (ST Bus News : 50 percent discount for bus travel for women from today)

 

वादळ, विजेच्या कडकडाटासह मध्यम पावसाचा इशरा

 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून राज्यातील प्रवाशांसाठी याआधीच सुमारे 30 प्रकारच्या सवलती दिल्या जातात. या सवलतीची शुल्क प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून महामंडळाला केली जाते. (ST Bus News : 50 percent discount for bus travel for women from today)

 

राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना 33 ते 100 टक्के पर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते. यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त राज्य शासनाने 75 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती. तसेच 65 ते 75 वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या बसमधून तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या दोन्ही घटकांना एसटीच्या प्रवासी भाड्यात सवलत दिली जाते. या प्रवाशांच्या तिकीट दरातील शुल्क प्रतिपूर्ती महाराष्ट्र सरकार करणार आहे. (ST Bus News : 50 percent discount for bus travel for women from today)

 

 

एसटी प्रवासातील सवलतीबाबत शासनाने घोषणा 9 मार्चला केली तरी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासन आदेशाची (GR) आवश्यकता असते. शासन आदेशाशिवाय कोणत्याही घोषणेवर अंमलबजावणी होत नाही. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व महिलांना एसटी महामंडळामधे सरसकट 50 टक्के तिकीट दरामधे सवलत जाहीर केली. परंतु, या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी आदेश निघाला असून, त्याची अंमलबजावणी होणार आहे.  (ST Bus News : 50 percent discount for bus travel for women from today)

Local ad 1