मोठी बातमी : आता आधार अपडेटसाठी पैसे द्यावे लागणार नाही

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांना (Aadhaar Card) आधार कार्ड अपडेट करण्यासाठी 50 रुपये शुल्क द्यावे लागत आहेत. मात्र, आता पुढील काही महिने शुल्क द्यावे लागणार नाहीत. (No need to pay for Aadhaar update)

 

 

 UIDAI च्या वतीने ट्विटरवरुन दिलेल्या माहितीनुसार आता आधार अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागणार नाहीत. UIDAI ने आधार अपडेट करण्याचे शुल्क रद्द केल्याचे जाहीर केले आहे. पण, यासाठी एक अट आहे. जर तुम्ही आधार अपडेटची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केली, तरच तुम्हाला आधार अपडेटसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाहीत. तेच जर तुम्ही आधार कार्ड फिजिकल काऊंटरवर अपडेट केलं तर त्यासाठी मात्र 50 रुपये द्यावे लागतील.  (No need to pay for Aadhaar update)

 

आधार धारकांना तीन महिन्यांसाठी या मोफत आधार अपडेट सुविधेचा लाभ घेता येईल. आधार कार्ड धारक 15 मार्च 2023 ते 14 जून 2023 पर्यंत त्यांचे आधार कार्ड ऑनलाईन अपडेट करु शकतात. (No need to pay for Aadhaar update)

 

Local ad 1