नांदेड जिल्ह्यात लम्पीचा धोका वाढतोय ; 19 गावातील 71 जनावरांना लम्पी

नांदेड : नांदेड जिल्ह्यात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गावपातळीपर्यंत ग्रामपंचायतींना दक्षतेचे निर्देश दिले आहेत. आजच्या स्थितीत नांदेड जिल्ह्यात एकुण 19 बाधीत गावे झाली आहेत. या बाधीत गावातील पशुधन संख्या (गाय वर्ग) 10 हजार 138 एवढी आहे. यातील लम्पी बाधीत पशुधन संख्या (गाय वर्ग) 71 एवढी आहे. (Dhepali threat is increasing in Nanded district; Lumpy to 71 animals in 19 villages)

 

 

बाधीत गावाच्या 5 किमी परिघातील गावांची संख्या 138 एवढी झाली आहे. एकुण गावे (बाधित अधिक 5 किमी परीघ) 157 गावातील पशुधनाची संख्या ही 48 हजार 249 एवढी आहे. यात बाधित व परिघाच्या गावातील पशुधनाची संख्या 58 हजार 387 एवढी गणण्यात आली आहे. (Dhepali threat is increasing in Nanded district; Lumpy to 71 animals in 19 villages)

 

 

लसीकरणाच्या दृष्टिकोनातून सद्यस्थितीत उपलब्ध लस मात्रा 2 लाख 10 हजार एवढी आहे. आज रोजी 26 हजार 402 जनावरांचे लसीकरण झाले आहे. तर एकुण प्रागतिक लसीकरण हे 44 हजार 963 एवढे आहे. मृत पशुधनाची संख्या 2 एवढी आहे. (Dhepali threat is increasing in Nanded district; Lumpy to 71 animals in 19 villages)

 

वाघी व देगलू तमलूर गावे बाधीत क्षेत्र म्हणून घोषित

जिल्ह्यात उद्भवलेल्या लम्पी आजारावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष आहे. नांदेड तालुक्यातील मौजे वाघी व देगलूर तालुक्यातील तमलूर या गावात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव दिसून आल्याने ही गावे बाधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. (Dhepali threat is increasing in Nanded district; Lumpy to 71 animals in 19 villages)

 

 

 

 

प्राण्यामधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 अन्वये जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील मौजे वाघी तसेच देगलूर तालुक्यातील मौजे तमलूर येथील पशुधनामध्ये लम्पी स्किन डिसीजची लागण झाल्याचा रोग निदान अहवाल सहआयुक्त पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग, औंध पुणे यांच्याकडून प्राप्त झाला आहे. (Dhepali threat is increasing in Nanded district; Lumpy to 71 animals in 19 villages)

 

बाधीत परिसरामध्ये स्वच्छता व निर्जंतूक द्रावणाची फवारणी, रोग प्रसारास कारणीभूत असलेल्या डास, माश्या, गोचीड इत्यादीच्या नियंत्रणासाठी औषधांची फवारणी, लम्पी स्किन रोगांचा प्रादुर्भाव व प्रसार थांबविण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपरिषद, नगरपंचायत व महानगरपालिका यांचेमार्फत त्यांचे कार्यक्षेत्रातील भटक्या पशुधनाचे नियमित निरीक्षण करण्यात यावे. तसेच बाधीत पशुधनाची काळजी घ्यावी असे सांगितले आहे.

 

लम्पी आजारावरील लसीकरण 30 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करा 

जिल्ह्यात उद्भवलेल्या लम्पी आजारावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यातील गावांमध्ये लम्पी आजाराचा प्रादुर्भाव दिसून आल्याने ती गावे बाधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. लम्पी आजारावर नियत्रंण व प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील पशुधनास लम्पी आजारापासून संरक्षण मिळण्यासाठी 100 टक्के लसीकरण 30 सप्टेंबर पर्यत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हादंडाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी आज संबंधित यंत्रणेला दिले.

 

 

परदेशी यांनी आज लिंबगाव येथे रोगप्रतिबंधक लसीकरण कॅम्पला भेट देवून पशुपालकांची विचारपूस केली. तसेच गोचीड, गोमाशापासून गोठे फवारणी करुन घेण्याचेही त्यांनी आवाहन केले. (Dhepali threat is increasing in Nanded district; Lumpy to 71 animals in 19 villages)

 

 

पशुधनामध्ये उद्भवलेल्या विषाणूजन्य लम्पी रोगाच्या संदर्भात पशुपालकांमध्ये भिती निर्माण होऊ नये म्हणून लसीकरणासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी नेमून दिलेल्या ठिकाणी लसीकरण करण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. लसीकरण प्रक्रीयेत कोणीही दुर्लक्ष करता कामा नये अन्यथा त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी आढावा वैठकीत दिला.

 

 

 

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी लसीकरण एका आठवड्यात पूर्ण करावेत, असे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले. लसीकरण पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यात लस व औषधीसाठी निधी कमी पडू देणार नाही, असेही त्यांनी सांगितले. लसीकरणासाठी पशुधनाच्या निकषानुसार लस व औषधी पुरवठा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांच्या नियोजनातून करण्यात येत आहे.

 

Local ad 1