नांदेड : नांदेड जिल्ह्यात लम्पी बाधित पशुधनाची संख्या (गाय वर्ग) 171 एवढी झाली असून जिल्हा प्रशासनातर्फे लसीकरणावर अधिक भर दिला आहे. गुरुवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी संपूर्ण जिल्हाभर लसीकरणावर नियोजनबद्ध भर देऊन आज रोजी 30 हजार 100 एवढ्या पशुधनाचे लसीकरण करण्यात आले. आजवर जिल्ह्यात एकुण 3 लाख 17 हजार 818 पशुधनाचे प्रागतिक लसीकरण पूर्ण झाले आहे. (Lumpy infection is increasing in the district; 171 animals affected)
Related Posts
लम्पी हा आजार गोठ्यातील अस्वच्छता, पशुधनाच्या अंगावरील गोचिड लम्पीचा संसर्ग व इतर किटकांमुळे होण्याचा संभव अधिक असतो. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे ग्रामपातळीवर जाऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. (Lumpy infection is increasing in the district; 171 animals affected)
आजच्या घडीला नांदेड जिल्ह्यातील 45 गावे लम्पी बाधित आहेत. या 45 गावातील एकुण गाय वर्ग पशुधन हे 22 हजार 715 एवढे आहे. यातील 171 बाधित पशुधनाला वेगळे काढून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. बाधित गावाच्या 5 किमी परिघातील गावांची संख्या 283 एवढी आहे. एकुण गावे 328 झाली आहेत. ( Lumpy infection is increasing in the district; 171 animals affected)
बाधित 45 गावांच्या 5 किमी परिघातील 328 गावातील (बाधित 45 गावांसह) एकुण पशुधन संख्या ही 92 हजार 400 एवढी आहे. लम्पीमुळे मृत पशुधनाची संख्या 13 एवढी झाली आहे. उपलब्ध लस मात्रा 3 लाख 78 हजार 250 एवढी असून पशुपालकांनी घाबरून न जाता आपल्या पशुची स्वच्छता, गोठ्यातील स्वच्छता व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले आहे. (Lumpy infection is increasing in the district; 171 animals affected)