shasan nirnay 2023 । स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राज्य शासनाने ७५ हजार पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेत वर्ग – ३ च्या एकूण पदभर्तीपैकी 10 टक्के जागा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामपंचात कर्मचाऱ्यांना मोठा दिला मिळला आहे (Shasan Nirnay 2023. Ten percent seats for Gram Panchaya employees in Zilla Parishad recruitment)
जिल्हा परिषदांमध्ये २०२३ मध्ये होणाच्या सरळसेवा पदभरतीसंदर्भात दि.१९ मने रोजी अपर मुख्य सचिव (ग्रामविकास) यांचे अध्यक्षतेखाली सर्व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांसमवेत Vdeo comference आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत सन २०२३ मधील जिल्हा परिषदेतील वर्ग ३ (गट-क) च्या कर्मचाऱ्यांची सरळसेवा भरती प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र, सध्या पदभरती प्रत्यक्षात सुरू नसल्याने व सरळसेवा भरतीनियमित न झाल्यामुळे ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांचे वय वाढत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचान्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. तसेच सद्यास्थितीत १० टक्के ग्राम पंचायत कर्मचाच्यांच्या आरक्षणानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येत नसल्याची बाब समोर आली आहे. (Shasan Nirnay 2023. Ten percent seats for Gram Panchaya employees in Zilla Parishad recruitment)