पठाणमधील बेशरम गाण्यावरुन सुरु असलेल्या वादावार शाहारुख खानने दिली प्रतिक्रिया..

Pathan Besharam Rang : अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) बहुचर्चित पठाण चित्रपटातील (Pathaan Movie) ‘बेशरम रंग‘ (Besharam Rang Song) गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. त्या गाण्याला काही लोक विरोध करत आहेत. तसेच पठाण चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही करत आहेत. त्यावर अभिनेता शाहरुख खानने प्रतिक्रिया दिली आहे. (ShahRukh Khan reacts to the controversy over the song Besharam in Pathan)

 

 

 

कोलकाता येथे झालेल्या 28 व्या कोलकाता फिल्म फेस्टिव्हलमध्ये शाहरुख खानने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. शाहरुख म्हणाला, “काही लोक सोशल मीडियावर नकारात्मकता पसरवत आहेत. सिनेमा हे समाज बदलण्याचे माध्यम आहे. (ShahRukh Khan reacts to the controversy over the song Besharam in Pathan)

 

 

पठाण सिनेमाचे पहिले गाणे ‘बेशरम रंग’ 12 डिसेंबर रोजी प्रदर्शित (रिलीज) झाले आहे. या गाण्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि शाहरुख खानची केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. शेअर केलेल्या या व्हिडीओमधील गाण्यात दीपिकाचा ग्लॅमरस आणि बोल्ड लूक दिसत आहे. ‘बेशरम रंग’ या गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोणने  घातलेल्या बिकीनीच्या भगव्या रंगावर काही लोकांनी आक्षेप घेतला आहे. त्यावर चित्रपटावरच बंदी घालण्याची मागणी होत आहे.

 

 

‘पठाण’ सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. हा सिनेमा येत्या 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू भाषेत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंदने (Siddharth Anand) या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. (ShahRukh Khan reacts to the controversy over the song Besharam in Pathan)

 

 

‘पठाण’ या सिनेमात शाहरुखसह दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमदेखील मुख्य भूमिकेत आहेत. ‘बेशरम रंग’ या गाण्याचा व्हिडीओ शाहरुखने शेअर करताना “तिला पाहून तुम्हालाही कळेल…सौंदर्य ही एक वृत्ती आहे”. असे लिहले आहे. (ShahRukh Khan reacts to the controversy over the song Besharam in Pathan)

Local ad 1