जिल्हाधिकारी कार्यालयातील गुंठेवारीच्या फाईल असलेल्या कक्षाला आग, जिल्हा प्रशासनाचे आले स्पष्टीकरण
नांदेड : ग्रामीण भाग असो की, शहरांच्या लगतच्या भागात बेकायदा गुंठेवारी (Illegal Gunthewari) पद्धतीने जमिन विकण्यात आली आली आहे. त्यामुळे अनियंत्रित शहरे वाढत असून, आता शासनाने अटी व शर्थिंची पूर्तता करणारी गुंठेवारी कायम करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील गुंठेवारीच्या फाईल असलेल्या कक्षाला आग लागली आहे. त्यातच आता जिल्हा प्रशासनाने सर्व फाईल सुरक्षित असल्याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. (Gunthewari’s file room in Collector’s office on fire)