भाजपच्या घंटानाद आंदोलनावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया

पुणे Pune news : भाविकांना दर्शनासाठी मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपकडून घंटानाद आंदोलन करण्यात आले. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रात भाजपचे सरकार आहे, त्यांनी कोरोना प्रादुर्भाव होऊनये यासाठी राज्याला पत्र पाठवलं आहे. ते भाजप नेत्यांना माहीत नाही का? तर माहीत आहे, अशा शब्दांत  अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी भाजपवर पलटवार केला आहे. (The bell ringing movement is just politics)  

 

 

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी (दि.3) झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर अजित पवार पत्रकार परिषदेत बोलत होते. (Press conference held at Vidhan Bhavan, Pune) यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना आपल्या खास शैलीत उत्तर दिली.

 

राज्यातील मंदिरे भाविकांसाठी खुले करा, या मागणीसाठी भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घंटानाद आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले आहे. त्याविषयी विचारलं असता, अजित पवार म्हणाले, मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करत आहेत, त्यांचे केंद्रात सरकार आहे. केंद्राच्या आरोग्य विभागाने काय सांगितलं आहे, याची त्यांनी माहिती घ्यावी, मग आंदोलन करावं. केंद्र सरकार नागरिकांची काळजी घेण्यास सांगत आहे. धार्मिक स्थळे सुरू करण्याची आमची मनाची तयारी आहे. परंतु, नागरिकांच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य देणे मह्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले. (The bell ringing movement is just politics)

 

पहिल्या दिवशीची गर्दी पाहून निर्णय

पुण्यामधील गणेशोत्सव साजरा करताना नागरिकांनी कोरोनाचे नियमांचे पालन करून, साधेपणा साजरा करणे आवश्यक आहे. मोठ्या गणेश मंडळासंदर्भात मुख्यमंत्री आपल्या स्तरावर निर्णय घेतील. गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशीचा अंदाज पाहून दुसऱ्या दिवशी निर्णय घेतला जाईल. जर पहिल्या दिवशी गर्दी झाली तर गणेशोत्सवामध्ये कडक निर्बंध लागू केले जातील, असा इशारा ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

 

 

इंधन दरवाढीवरून केंद्रावर निशाना

नागरिकांनी विश्वासाने केंद्र सरकारमध्ये भाजपाला निवडून दिले आहे. अगोदरच कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा काळात केंद्राने धोरण आखणे महत्वाचे होते. तर दुसरीकडे दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन सुरू असताना तिकडे लक्ष देण्यास केंद्राला वेळ नाही. लोकशाही मार्गाने आंदोलन करूनही त्याकडे केंद्र सरकार लक्ष देत नाही हे देशाचे दुर्देव आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. (The bell ringing movement is just politics)

Local ad 1