MPSC Result 2022 : राज्य उत्पादन शुल्क’चा अंतिम निकाल जाहीर

MPSC Result 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (Maharashtra Public Service Commission) 6 आणि 20 ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा – 2021 दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निकालाची (MPSC Result 2022) अंतिम यादी आज https://mpsc.gov.in/ या वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे. (Second Inspector, State Excise Final Result Declared)

 

 

परिक्षेत पुणे जिल्ह्यातील आनंद नाना जावळे हे राज्यातून व मागासवर्ग संवर्गातून तर महिला वर्गवारीतून सातारा जिल्ह्यातील अक्षता नाळे ह्या प्रथम आल्या आहेत. उमेदवारांना सविस्तर निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर पाहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. (Second Inspector, State Excise Final Result Declared)

 

मुंबईसह औरंगाबात, अमरावती, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हाकेंद्रांवर ही परीक्षा झाली होती. त्यानुसार एकूण ११४ उमेदवारांची प्रस्तुत पदाकरिता शिफारस करण्यात आली आहे, असे आयोगाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. (Second Inspector, State Excise Final Result Declared)

 

 

 

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस (MPSC Result 2022) यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. (Second Inspector, State Excise Final Result Declared)

Local ad 1