अक्षरदान प्रतिष्ठानतर्फे संत तुकाराम वैश्विक कथालेखन स्पर्धा

पुणे : अक्षरदान प्रतिष्ठानतर्फे ‘संत तुकाराम वैश्विक कथालेखन स्पर्धा‘ आयोजित केली आहे. कथेला विषयाचे बंधन नसून मराठी भाषेत लिहिलेली कथा दि. २५ ऑगस्टपर्यंत पाठविणे आवश्यक आहे. (Sant Tukaram Global Story Writing Competition organized by Akshardan Foundation)

 

 

कथा स्पर्धेचे हे दुसरे वर्षे असून प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ५००१, ३००१, २००१ रुपयांची पुस्तके, प्रमाणपत्र, संत तुकाराम महाराजांची प्रतिमा देऊन, तर सर्व सहभागींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे. (Sant Tukaram Global Story Writing Competition organized by Akshardan Foundation)

 

 

 

“पहिल्या वर्षी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पुन्हा यावर्षी दर्जेदार लेखनाला, नवोदित लेखकांना व्यासपीठ मिळावे आणि वैश्विक दर्जाचे श्रेष्ठ विचारवंत, साहित्यिक असलेल्या संत तुकाराम महाराजांचे स्मरण व्हावे यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. इच्छुकांनी akshardan2014@gmail.com यामेलवर कथा पाठवाव्यात,” असे आवाहन अक्षरदानचे संपादक मोतीराम पौळ यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९६३७९९३३१९ या क्रमांकावर संपर्क साधावा. (Sant Tukaram Global Story Writing Competition organized by Akshardan Foundation)

Local ad 1