नांदेड Nanded news : राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण (Public Works Minister Ashok Chavan) यांच्या सुविद्य पत्नी माजी आमदार अमीताताई चव्हाण (Former MLA Amitatai Chavan) यांच्या वाढदिवसानिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा इयत्ता पाचवी ते दहावी वर्ग गटात ‘कोरोनाचा शिक्षणावर झालेला परिणाम’ या विषयावर निबंध स्पर्धा होणार आहे. (Essay competition on ‘Corona’s Impact on Education’)
मीमांसा फाऊंडेशन, समीक्षा, ह्यूमन राईट्स फाऊंडेशन व मंथन क्रिएटिव्ह ग्रुपच्यावतीने दरवर्षी माजी आ.अमीताताई चव्हाण यांच्या वाढदिवसानिमीत्त विविध समाजपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.
विसावा ग्रुपचे संचालक बालाजी इबीतदार, ह्युमन राईट्सचे रामेश्वर धुमाळ व संपादक रूपेश पाडमुख यांच्या संकल्पनेतून निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ६ ऑक्टोंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्यांना बक्षीस वितरण केले जाणार आहे. (Essay competition on ‘Corona’s Impact on Education’)
या गटात प्रथम पारितोषीक १००१/- व प्रशस्तीपत्रक, द्वितीय पारितोषीक ७०१/- व प्रशस्तीपत्रक व तृतीय पारितोषीक ५०१ व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. दुसऱ्या गटात वय १८ ते ३० वयोगटातील स्पर्धक सहभागी होऊ शकतात. त्यात आजच्या तरूणापुढील उद्योग क्षेत्रातील संधी व आव्हाने या विषयावर स्पर्धा होणार असून, प्रथम पारितोषीक २००१/- व प्रशस्तीपत्रक, द्वितीय पारितोषीक १००१/- व प्रशस्तीपत्रक, तृतीय पारितोषीक विभागून ५०१ व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे.
स्पर्धकांनी निबंध कागदाच्या एका बाजूला समास सोडून स्वच्छ हस्ताक्षरात लिहावा. जास्तीत जास्त एक हजार शब्दांची मर्यादा असेल. स्पर्धकांनी आपले संपूर्ण नांव, पत्ता, वर्ग, वय, फोटो व संपर्क क्रमांक द्यावा. स्पर्धकांनी बंद लिफाफ्यावर निबंधाचा विषय लिहून तो लिफाफा दि. २२ सप्टेंबर २०२१ पर्यंत दुपारी २ वा. ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दै.समीक्षा कार्यालय, कुसूमताई चव्हाण मार्ग, शिवाजीनगर, नांदेड येथे आणून द्यावेत. दि. २८ सप्टेंबर २०२१ रोजी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येणार असून परिक्षकांचा निकाल अंतीम राहणार आहे.