मराठी माणसाला डिवचू नका, आता इतकंच सांगतो ! : राज ठाकरे

राज्यपालांच्या वक्तव्यानंतर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया

Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari controversial statement) यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले असून, त्याचे राज्यात पडसाद उमटत आहेत. राज्यपालांच्या वक्तव्याचा राज ठाकरे यांनी जोरदार समाचार घेतला आहे. सोशल मीडियावर एक पत्र पोस्ट करत “आता इतकच सांगतो” असे लिहीत एक प्रकारे इशारा दिला आहे. (Raj Thackeray said to the Governor “I am telling you this much”!)

 

 

 

राज्यपाल यांनी केलेले वक्तव्या

गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य भगसिंह कोश्यारींनी केले आहे. शुक्रवारी मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. (Raj Thackeray said to the Governor “I am telling you this much”!)

 

 

राज ठाकरे यांनी पोस्ट केलेले पत्र

 

राज ठाकरे म्हणाले? कोश्यारींची होशियारी?

आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहीत नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे म्हणून आपल्याविरूध्द बोलायला लोक कचरतात, परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात. महाराष्ट्रात मराठी माणसानं येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का? उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय; हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो.
जय महाराष्ट्र !

Local ad 1