पुणे : महसूल विभागाकडून राज्यातील सात तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यात नशिक विभागातील पाच तर पुणे विभागातील तीन तहसीलदारांचा (Three Tehsildars of Pune Division) समावेश आहे. महाराष्ट्र शासनाचे उप सचिव अजित देशमुख (Ajit Deshmukh, Deputy Secretary to Government of Maharashtra) यांनी बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. (Transfers of seven Tehsildars in the state)
नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील (पुरवठा) (Nashik Divisional Commissioner’s Office) तहसीलदार साहेबराव सोनावणे (Tehsildar Sahebrao Sonawane) यांची साक्री जि. धुळे येथे बदली करण्यात आली आहे. नियुक्तच्या प्रतीक्षेत असलेले योगेश शिंदे यांना नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील (Nashik Collector’s Office) संजय गांधी योजना (Sanjay Gandhi Yojana) येथे पदस्थापना देण्यात आली. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी योजनेच्या तहसीलदार दिपाली गवळी यांची नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील (पुरवठा) तहसीलदार या पदावर बदली करण्यात आली. नाशिक शहर धान्य वितरण अधिकारी नितीन गर्जे यांची नंदूरबार येथे तहसीलदार येथे बदली करण्यात आली.
नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले शेख फसायोद्दीन (Sheikh Fasayuddin) यांना तहसीलदार बार्शी जि. सोलापूर (Tehsildar Barshi Distt. Solapur) येथे पदस्थापना देण्यात आली. तसेच नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले राजेंद्र ननज यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालातील तहसीलदार (महसूल) (Tehsildar (Revenue) in Pune Collectorate) येथील अजित कुर्हाडे यांच्या बदलीने रिक्त होणार्या ठिकाणी बदली करण्यात आली. सुरगाणा तहसीलदार सचिन मुळीक यांची आटपाडी जि.सांगली येथे तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली.
दरम्यान, सुनील शेरखाने आणि अजित कुर्हाडे यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्ररीत्या निर्गमित करण्यात येणार आहेत.
पुणे विभागातील तीन तहसीलदारांच्या बदल्या (Transfer of three Tehsildars in Pune Division) करण्यात आल्या आहेत. त्यात मोहोळ सोलापूरचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांची बदली तहसीलदार खेड येथे बदली करण्यात आली. तसेच नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले अभिजित जाधव यांना फलटण तहसीलदार म्हणून पदस्थपाना देण्यात आली.