दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षे संदर्भात महत्वाची बातमी…प्रश्न प्रत्रिका वाटपाविषयी झाला महत्वाचा बदल

नांदेड : इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी, आकलन होण्यासाठी परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते. या परीक्षेचा विद्यार्थ्यांच्या जीवनात एक महत्वपूर्ण टप्पा असतो. (Important news regarding the examination of 10th-12th students)

अभिनेत्री स्वरा भास्करने फहाद अहमदशी नोंदणी पद्धतीने केला विवाह

पालक व समाज घटकांचे या परीक्षेकडे बारकाईने लक्ष असते. परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा व काही अंशी घटना मंडळाच्या निदर्शनास आलेल्या आहेत. अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध होवून परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपी मुक्त वातावरणात सुरळीत पार पडण्याच्यादृष्टीने परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनीटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेपासून रद्द करण्यात आली आहे. परंतू विद्यार्थ्याचे हित लक्षात घेवून सदरची दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर वाढवून देण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी परिपत्रकान्वये कळविले आहे.
फेब्रुवारी- मार्च 2023 परीक्षेपासून सकाळ सत्रात सकाळी 11 वा. तसेच दुपार सत्रात दुपारी 3 वा. परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल व लेखनास प्रारंभ होईल. सकाळ सत्रात सकाळी 10.30 वा. तसेच दुपार सत्रात दु. 2.30 वाजता परीक्षार्थ्यांने परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. (Important news regarding the examination of 10th-12th students)

 

ग्रामीण गुंठेवारी प्रस्‍ताव सादर करण्यास मुदतवाढ ; कोण दाखल करू शकतो प्रस्ताव जाणून घ्या..

परीक्षेची सध्याची वेळ सकाळी 11 ते दुपारी 2 असून, सुधारित वेळ सकाळी 11 ते दु.2.10 याप्रमाणे राहील. परीक्षेची सध्याची वेळ सकाळी 11 ते दु. 1 असून सुधारित वेळ दुपारी 11 ते दु.1.10 याप्रमाणे राहील. परीक्षेची सध्याची वेळ सकाळी 11 ते दु. 1.30 असून सुधारित वेळ दुपारी 11 ते दु.1.40 याप्रमाणे राहील. दुपार सत्रात दु. 3 ते सायं 6 असून सुधारित वेळ दु. 3 ते सायं 6.10 याप्रमाणे राहील. दुपार सत्रात दु. 3 ते सायं 5 असून सुधारित वेळ दु. 3 ते सायं 5.10 याप्रमाणे राहील. दुपार सत्रात दु. 3 ते सायं 5.30 असून सुधारित वेळ दु. 3 ते सायं 5.40 याप्रमाणे राहील, असेही प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. (Important news regarding the examination of 10th-12th students)
Local ad 1