दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनो सीईटी परिक्षेच्या (CET exam) तयारीला लागा..

सीईटीत चांगले गुण मिळाले तर मिळणार नामांकित महाविद्यालयात अकरावीला प्रवेश

मुंबई : दहावीचा निकाल जाहीर झाला असून, अंतर्गत मूल्यमापनाद्वारे घोषिक केलेल्या निकालात विद्यार्थ्यांना 90 टक्के, 100 टक्के गुण मिळाले. म्हणून त्यांना हव्या त्या महाविद्यालयात अकरावीला प्रवेश मिळणार नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांना अग्नी परिक्षा म्हणजेच सीईटी (CET exam) परिक्षा द्यावी लागणार आहे. त्यातूनच विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित केला जाणार आहे.

 

The results of Class X were announced on Friday (July 16) and the students got 90 per cent, 100 per cent marks in the results declared through internal assessment. So they will not get admission in the college they want. For this, students will have to take Agni Pariksha i.e. CET exam. Admission to the students will be confirmed from that.

 

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शाळेत न जाताही अंतर्गत मूल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांना गुणदान देण्यात आले. आता विद्यार्थ्यांना नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी यावर्षी पहिल्यांदाच अकरावी सीईटी प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना 90 ते 100 टक्के मिळाले. मात्र, हे गुण मिळून सुद्धा विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीचे नामांकित कॉलेज मिळणार नाही. कारण तुम्हाला यंदाच्या वर्षी नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर अकरावी सीईटी परीक्षेत (CET exam) सुद्धा तुम्हला चांगले गुण मिळवावे लागणार आहे. कारण त्या गुणांच्या आधारेच मेरीट लिस्टनुसार नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार आहे.

 

Students were rated through an internal assessment even without going to school on Corona’s background. Students will have to appear for the 11th CET entrance exam this year to get admission in a reputed college. Billions of students in the state scored 90 to 100 percent. However, even with these marks, students will not get a reputed college of their choice. Because if you want to get admission in a reputed college this year, you will also have to get good marks in the eleventh CET exam. Because on the basis of those marks, admission will be given in the nominated college according to the merit list.

 

गणित, विज्ञान, इंग्रजी, सामाजिक शास्त्र या विषयांचे प्रत्येकी पंचवीस गुण या शंभर गुणांच्या परीक्षेत समाविष्ट असतील. ऑगस्टच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात या परीक्षेचे नियोजन बोर्डाकडून केले जात आहे. त्यामुळे 85, 90, 95, 100 टक्के गुण घेऊन सुद्धा विद्यार्थ्यांना तुम्हला नामांकीत कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाहीये. त्यासाठी अकरावी सीईटीत सुद्धा अभ्यास करून जास्तीत जास्त गुण घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे गुण चांगले मिळाले म्हणून हुरळून जाऊ नका आणि सीईटीच्या तयारीला लागा.

 

Twenty-five marks each in Mathematics, Science, English, Social Sciences will be included in the 100 marks examination. The exam is being planned by the board in the second or third week of August. Therefore, even with 85, 90, 95, 100 percent marks, students will not get admission in your reputed college. For this, one has to study in the eleventh CET and try to get maximum marks. So don’t get excited as you get good marks and start preparing for CET

Local ad 1