अभिनेत्री स्वरा भास्करने फहाद अहमदशी नोंदणी पद्धतीने केला विवाह

Swara Bhasker : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) ही विविध आंदोलन व स्पष्ट वक्तेपणामुळे चर्चेत असते. मात्र, ती आज एका वेगळ्यात कारणाने चर्चेत आली आहे. (Actress Swara Bhaskar got married to Fahadh Ahmed in a registered marriage)

 

फहाद जिरार अहमदसोबत  (Fahad Ahmad) स्वरा विवाहबद्ध झाली आहे, हे वाचून तुम्हांला धक्काच बसला असेल ना ? पण ही बातमी खरी आहे. त्याला स्वराने आणि फहादने ट्विटर करत दिला आहे. (Actress Swara Bhaskar got married to Fahadh Ahmed in a registered marriage)

 फहाद अहमद हा सामाजिक कार्यकर्ता असून, समाजवादी पक्षाची युवक आघाडी असलेल्या समाजवादी युवाजन सभा या संघटनेचा महाराष्ट्र अध्यक्ष आहे. स्वरा आणि फहाद यांनी नोंदणी पद्धतचीने विवाह केला आहे. स्वराने (Swara Bhasker) तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील एक व्हिडीओ शेअर करुन फहाद आणि तिच्या लग्नाची माहिती दिली. (Actress Swara Bhaskar got married to Fahadh Ahmed in a registered marriage)

 

व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

स्वरा भास्कर हिने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला असून, त्याला कॅप्शन दिल आहे. त्यात ती म्हणते, ‘काहीवेळा तुम्ही तुमच्या शेजारी असलेली एखादी गोष्ट दूरवर शोधता. आम्ही प्रेम शोधत होतो, परंतु आम्हाला प्रथम मैत्री मिळाली. माझ्या हृदयात तुझं स्वागत आहे.’ स्वरानं शेअर केलेल्या व्हिडीओला फहादने रिप्लाय देखील दिला आहे. त्या रिप्लायमध्ये तो लिहितो, ‘हा गोंधळ इतकी सुंदर असू शकते हे मला माहीत नव्हते. प्रेमानं माझा हात धरल्याबद्दल मी आभार मानतो.’ (Actress Swara Bhaskar got married to Fahadh Ahmed in a registered marriage)

Local ad 1