राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजयादशमी पथसंचलन

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजयादशमी (Vijayadashami) पथसंचलनाचे आयोजन धायरीनगर सिंहगड (Sinhagad) भाग येथे बुधवारी (दि.5 ऑक्टोबर) करण्यात आले होते.  370 स्वयंसेवकांनी पथसंचलनात सहभाग घेतला. (Rashtriya Swayamsevak Sangh of Path Sanchalan) 

 

 

 

जे. के. हिल सोसायटी मागील मैदानात स्वयंसेवकांचे एकत्रीकरण झाले. गणेशनगर मंदिरात धायरी संघचालक सचिन नागपुरे यांच्या हस्ते शंख आणि ध्वजाचे पूजन करून घोषाची मानवंदना देऊन पथसंचलनाला सुरवात झाली.  (Rashtriya Swayamsevak Sangh of Path Sanchalan)

 

 

पथसंचलन जे. के. हिल सोसायटी ते धायरी फाटा व जे. के. हिल सोसायटी ते बेनकर वस्ती या मार्गांवर आकर्षक रांगोळ्या व फुलांच्या पायघड्या घालून पथसंचलनाचे स्वागत करण्यात आले. त्याबरोबरच ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली.(Rashtriya Swayamsevak Sangh of Path Sanchalan)

 

 

धायरी नगराचे संघचालक सचिन नागपुरे, कार्यवाह चेतन होशिंग यांच्यासह स्वयंसेवकांनी पथसंचलनात सहभाग घेतला. नगरातील समाजसेवक व विविध क्षेत्रातील जोडले गेलेले मान्यवर आणि नागरिक बंधु भगिनींनी ध्वजाचे स्वागत केले. (Rashtriya Swayamsevak Sangh of Path Sanchalan)

Local ad 1