Bhagat Singh Koshyari : माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला : राज्यपाल  

  • Bhagat Singh Koshyari : राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या भाषणासंदर्भात त्यांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केले गेले असे म्हटले आहे. (My statement was distorted : Governor Bhagat Singh Koshyari) 

 

 

 

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी  (Bhagat Singh Koshyari controversial statement) यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य करून राज्यपालांनी महाराष्ट्राचा (Maharashtra) अपमान केला आहे, अशी टिका विरोधकांनी केला आहे. त्यावर आता भगत सिंह कोश्यारी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. (My statement was distorted : Governor Bhagat Singh Koshyari) 

 

 

 

नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहेच. अलीकडे प्रत्येक बाबतीत राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झाली आहे, ती आपल्याला बदलावी लागेल, असे त्यांनी म्हंटले आहे.  मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला आहे. (My statement was distorted : Governor Bhagat Singh Koshyari) 

 

 

काल राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो. मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही, असे राज्यपालांनी म्हटलं आहे. (My statement was distorted : Governor Bhagat Singh Koshyari) 

Local ad 1