Nashik ACB Trap महसुल सप्ताहात तहसीदाराची मोठी कामगिरी ; पंधरा लाखांची लाच घेताना अटक

Nashik ACB Trap नाशिक :  महसूल विभागाकडून मिळणाऱ्या सोयी सुविधा तसेच विविध दाखले नागरिकांना वेळेत मिळावेत यासाठी 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्तहा साजरा केला जात आहे. यानिमित्त दररोज वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. मात्र, नाशिक जिल्ह्यातील एका तहसीलदाराला (Tehsildar) एका दंडात्मक कारवाईत मदत करण्यासाठी तब्बल पंधरा लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपथ प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. (Tehsildar arrested for taking bribe of 15 lakhs)

 

 

नरेशकुमार तुकाराम बहिरम (Naresh Kumar Tukaram Bahiram) (वय-  ४४ वर्ष, धंदा – तहसीलदार नाशिक, सध्या रा. फ्लॅट नंबर -६०४, बी विंग, मेरिडियन गोल्ड, कर्मयोगी नगर, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या तहसीलदाराचे नाव आहे.

 

 

सविस्तर लाच रिपोर्ट

▶️ *ला.प्र.वि. नाशिक
▶️ *तक्रारदार-* पुरुष,  ५२ वर्ष.
रा.  नाशिक
▶️   *आलोसे* –
नरेशकुमार तुकाराम बहिरम,
वय् – ४४ वर्ष, धंदा – तहसीलदार नाशिक, सध्या रा. फ्लॅट नंबर -६०४, बी विंग, मेरिडियन गोल्ड, कर्मयोगी नगर, नाशिक
▶️ *लाचेची मागणी
१५,००,००० /-  रुपये ( पंधरा लाख  रुपये )
▶️  *लाच स्वीकारली* –
१५,००,००० /-  रुपये ( पंधरा लाख  रुपये )

▶️  लाचेचे कारण
राजुर बहुला तालुका जिल्हा नाशिक येथील जमिनीच्या मालक  यांच्या जमिनीमध्ये मुरुम उत्खनना बाबत मूल्य नियमानुसार पाचपट दंड,  स्वामित्वधन जागा भाडे मिळून एकूण रक्कम १,२५,०६,२२०/- याप्रमाणे दंड आकारणी केले बाबत आलोसे यांच्या कार्यालयाकडील आदेश आले होते. त्या आदेशाविरुद्ध जमिनीच्या मालक यांनी उपविभागीय अधिकारी, नाशिक यांच्याकडे अपील दाखल केले होते त्याबाबत आदेश होऊन सदरचे प्रकरण पुनश्च फेर चौकशीसाठी नरेशकुमार बहिरम, तहसीलदार नाशिक यांच्याकडे पाठवण्यात आले होते.

सदर मिळकती मधील उत्खनन केलेला मुरूम त्याच जागेत वापर वापर झाल्याचे जमिनीच्या मालक यांनी त्यांचे कथनात नमूद केले होते. सदर बाबत पडताळणी करणे कामी आरोपी लोकसेवक यांनी जमिनीच्या मालक यांना त्यांच्या मालकीच्या राजुर बहुला तालुका जिल्हा नाशिक येथे स्थळ निरीक्षण वेळी बोलावले होते. परंतु जमिनीच्या मालक या वयोवृद्ध व आजारी असल्याने त्यांनी यातील तक्रारदार यांना त्यांच्या वतीने कायदेशीर कारवाई कामी अधिकार पत्र दिल्याचे दिल्याने ते आरोपी लोकसेवक यांना स्थळ निरीक्षण वेळी भेटली असता त्यांनी तक्रारदार  यांच्याकडे तडजोडीअंती 15 लाख रुपये लाचेची मागणी केली व सदरील लाच मागणी केल्याचे पडताळणी पंचनामा वेळी मान्य करून लाच स्वीकारण्याचे मान्य केले. व मागणी केलेली लाचेची रक्कम आज दिनांक ०५/०८/२०२३ रोजी लाच स्वीकारली म्हणून आरोपी लोकसेवक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू आहे

▶️ सापळा  अधिकारी
संदीप घुगे, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक (Sandeep Ghuge, Inspector of Police, Anti-Corruption Department, Nashik)
संपर्क क्रमांक – 8605111234
▶️ *सह् सापळा  अधिकारी*
*स्वप्नील राजपूत,* पोलीस
निरीक्षक, लाचलुचपत
प्रतिबंधक विभाग, नाशिक
▶️ *सापळा पथक*-
पो. ना. गणेश निबाळकर,
पो. ना. प्रकाश महाजन,
पो. शि. नितीन नेटारे.

▶️ मार्गदर्शक
शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (Superintendent of Police Sharmistha Gharge-Walawalkar)
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक
संपर्क क्रमांक – +919371957391
*मा. श्री. माधव रेड्डी* अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक.
संपर्क क्रमांक – 9404333049
**मा.श्री. नरेंद्र पवार* वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस  अधीक्षक कार्यालय , ला.प्र.वि. नाशिक.
संपर्क क्रमांक – +917977847637
—————————
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी  अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा.

Local ad 1