पुणे महापालिका निवडणूक कधीही लागू द्या आमची तयारी पूर्ण !
पुणे. स्थानिक स्वराज्य संस्था (Local Government) आणि पंचायत राज संस्थांवर प्रशासक राज आहे, अशा सर्व संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुका येत्या चार महिन्यांत पूर्ण करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (दि.६) महाराष्ट्र सरकारला (Government of Maharashtra) दिला आहे. त्यामुळे आता पुणे मनपाच्या निवडणुका ही होणार आहेत. पुण्यातील सर्व प्रमुख पक्षातील शहरध्यांनी निवडणुका कधीही लागू द्या, आमची तयारी आहे, अशी प्रतिक्रिया दिली. (Our readiness to hold municipal elections anytime)
मागील तीन वर्षांहून अधिक काळापासून पुणे मनपावर प्रशासक राज असून, न्यायालयाच्या निर्णया निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निवडणुकीसाठी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) याआधीच्या निवडणुकीप्रमाणे आगामी निवडणुकीत राखीव जागा ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. या निर्णयामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे जिल्हा परिषदेसह राज्यातील २८ महापालिका, २५ जिल्हा परिषदा आणि २८५ पंचायत समित्यांच्यानिवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यसरकारच्या वतीने निवडणुका कधीही जाहिर झाल्या तरी, आमच्या पक्षाची पुर्ण तयारीअसल्याचे सांगितले आहे.
गेल्या तीन वर्षांपासून पुणे महापालिकेवर प्रशासक राज असून, सर्वसामान्यांची कामे होत नाहीत. मात्र, सत्ताधाऱ्यांची कामे वेळेत पूर्ण होतात. अधीचे पाच वर्षे आणि प्रशासकांचे तीन असे एकूण 8वर्षांच्या कार्यकाळात भाजपने केलेली भ्रष्टाचार पुणेकरांसमोर आणले जाईल.निवडणुका कधी होतील, याचा अंदाज नव्हता. मात्र, काँग्रेस पक्षाने निवडणूक लढविण्याची संपूर्ण तयारी करुन ठेवली आहे. पक्ष निरीक्षकांनी शहरातील पक्षसंघटनेचा आढावा घेतला असून, ब्लॉक अध्यक्ष ही नियुक्त केले गेले आहेत. काँग्रेस पक्षाकडून इच्छूक असलेल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्यासूचना यापुर्वी देण्यात आल्या आहेत.– आरविंद शिंदे, अध्यक्ष पुणे शहर.
ज्या ओबीसी आरक्षणाची ढाल करून लोकशाहीला बाहेरचा रस्ता दाखवत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेता या सर्वच ठिकाणी राज्यातील सत्ताधाऱ्यांनी नोकरशाहीच्या माध्यमातून धुमाकूळ घातला आहे. त्यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे दुःख झालेले असणार आहे. परंतु सर्वसामान्य जनता आणि लोकशाहीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असणाऱ्या सर्व मनसे सैनिकांकडू न्यायालयाच्या आजच्या निर्णयाचे स्वागत असणार आहे.– साईनाथ बाबर, मनसे अध्यक्ष
न्यायलयाने आदेश दिला आहे,मात्र, राज्य सरकारची (महायुति) इच्छा आहे का, हा प्रश्न आहे. गेल्या आठ वर्षांत शहरातील विविध विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार केला आहे. तसेचअसा कोणाताही मोठा प्रकल्प भाजपला पुण्यात आणता आला नाही. त्यांच्याकडून मेट्रो प्रकल्प दाखवतील. गेल्या आठ वर्षांपासून भाजपने जनतेच्या पैश्यांचा चुराडा केलाअसून, ते पुणेकरांसमोर माडला जाईल. शिवसेना (युबीटी) मनपा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयार आहे. – संजय मोरे,शहर प्रमुख शिवसेना (युबीटी)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रकरण होते. मात्र, दुसरीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका डोळ्या समोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तयारी केली आहे. यासंदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, तसेच आवश्यक त्या सूचना करण्यात आल्याहोत्या. निवडणुका कधीही जाहिर झाल्या तरी, आमचा पक्ष तयार आहे. – प्रदीप देशमुख, कार्याध्यक्ष, पुणे शहर एनसीपी.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्यात, या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत आहे. “पुणेशहरात भाजपचे संघटन अतिशय मजबूत आहे. आम्ही नुकतीच शहरात साडेपाच लाख प्राथमिकपक्ष सदस्यांची नोंदणी पूर्ण केली आहे. त्याबरोबर नऊ हजार सक्रिय सदस्य नोंदणी लक्ष्य अंतिम टप्प्यात आहे. गेल्या निवडणुकीत भाजपचे 100 नगरसेवक निवडून आले होते.विविध पक्षातून पाच नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी 105 हून अधिकनगरसेवक निवडून आणण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”– धीरज घाटे, शहराध्यक्ष, भाजप पुणे.
सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासंदर्भात दिलेल्या निर्णयाचे शिवसेना पक्ष पूर्णतः समर्थन करतो, कारणस्थानिक स्वराज्य संस्था या विकासाचे मजबूत पाया आहेत. महानगरपालिकेची कार्यक्षमता निवडून आलेल्यालोकप्रतिनिधी मुळे वाढू शकते. पुणे शहराचा सर्वांगीण विकास, नागरी सुविधा, पायाभूत सुविधा आणि स्थानिक पातळीवरीलनिर्णयप्रक्रिया अधिक गतिमान व परिणामकारक होईल, असा आमचा ठाम विश्वास आहे. शिवसेनेचेसर्व पदाधिकारी व शिवसैनिक येणाऱ्या निवडणुकांसाठी सज्ज आहेत. – प्रमोद नाना भानगिरे, शहर प्रमुख शिवसेना
प्रशासन राज्य सरकार जनमताला डावलण्याचा महायुतीचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने उधळून लावला. पुणे शहरातील नागरिकांसह महाराष्ट्रातील तमाम नागरिकांसाठी हा अत्यंतदिलासादायक निर्णय आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत आहे. लवकरात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी देऊन हा भ्रष्टाचार समूळ उखडूनटाकण्यासाठी निवडणुका होणार आहेत. आमचा पक्ष त्यासाठी तयार आहे. – प्रशांत जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, पुणे.