Monsoon weather forecast। जून ते सप्टेंबर कालावधीत पाऊस कसा असेल? ; मॉन्सूनच्या आशेवर धुळवाफेची पेरणी करावी का? (व्हिडीओ)

Monsoon weather forecast । जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा राज्यात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस होईल. राज्यातील यंदा सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडेल. त्यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात (Marathwada and West Maharashtra) सरासरी 93 ते 95 टक्के पाऊस होईल. त्यामुळे कमी पावसाचा अंदाज असलेल्या भागातील शेतकऱ्यांनी खरिपाचे पीक नियोजन (Crop planning of Kharipa) करताना काळजी घ्यावी. मॉन्सूनच्या आशेवर धुळवाफ पेरणी करू नये, (steam sowing time) जमिनीत पुरेसा (६५ मिमी) ओलावा असल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन हवामान अंदाज व शेती विषयक तज्ज्ञ डाॅ.रामचंद्र साबळे (Dr. Ramchandra Sable, expert in weather forecasting and agriculture) यांनी केले आहे. (How will the rainfall be during the period from June to September?)

 

https://fb.watch/kXLo-uVOtT/

डाॅ. रामंचद्र साबळे यांचा व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 

 

डाॅ. रामचंद्र साबळे हे गेल्या 21 वर्षांपासून पावसाळ्यातील हवामानाचा अंदाज (Monsoon weather forecast) वर्तवित आहेत. आतापर्यंत एकदाही अंदाज चुकला नाही, असा दावा डाॅ.साबळे यांनी केला आहे. यंदाचा पावसाळा कसा असेल, याविषयी अंदाज व्यक्त केला आहे.  (How will the rainfall be during the period from June to September?)

राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस, विदर्भात शंभर तर मराठवाड्यात 93 टक्केच पाऊस  

 अंदाजात पाच टक्के कमी-अधिक तफावत राहण्याची शक्यता असून, डॉ. साबळे यांच्या स्थानिक ठिकाणच्या पाऊस अंदाज मॉडेलनुसार, संबंधित ठिकाणचे गेल्या ३० वर्षांचे हवामान आणि कृषी विद्यापीठांच्या हवामान केंद्रांनी नोंदविलेली यंदाची हवामान घटक स्थिती विचारात घेण्यात आली आहे. २०२३ मधील उन्हाळी हंगामातील ठराविक कालावधीचे कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग आणि सूर्य प्रकाशाचा कालावधी आदी घटकांच्या नोंदीवर हा अंदाज आधारित आहे, असे डॉ. साबळे यांनी सांगितले.

 

 

डॉ. साबळे म्हणाले, महाराष्ट्राच्या दुष्काळी पट्ट्याच्या काही भागात तेथील सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचे संकेत आहेत. वाऱ्याचा वेग कमी आढळल्याने जून, जुलै महिन्यांमध्ये धुळे जळगाव, राहुरी, कराड, अकोला, पेडगाव, सिंदेवाही येथे पावसात मोठे खंड पडतील. तर दापोली, पुणे, कोल्हापूर, नागपूर, यवतमाळ, निफाड, सोलापूर व परभणी येथे खंडाचा कालावधी कमी राहण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील मॉन्सूनची शाखा जास्त सक्रिय होणे संकेत असून, अरबी समुद्रातील शाखा सर्वसाधारण राहील.

कमी पाऊस आणि कालावधित येणाऱ्या पिकांना प्राधान्य द्या

कमी पाण्यावर येणारी व वाढीच्या काळात कमी पाणी लागणारी पिके उदा, मूग, मटकी, उडीद, चवळी, घेवडा, कारळा, बाजरी, सोयाबीन, तीळ, तसेच त्यानंतरच्या पेरणीसाठी सोयाबीन, सूर्यफूल यांचा अवलंब करावा. पावसाच्या स्थितीनुसार पीक पद्धती बदलण्यासाठी सोयाबीन, मका, ज्वारी व तूर ही पिके महत्त्वाची राहतील. बाजरी व तूर आंतरपीक पद्धती अवलंबावी, असे आवाहन डाॅ. साबळे यांनी केले.
Local ad 1