येणाऱ्या काळात कसा असेल पाऊस? (Rain) किती दिवस करावी लागणार प्रतिक्षा !

मुंबई : राज्यात सर्वत्र पावसाने दडी मारली असून, पावसाचे प्रमाण अत्यल्प असणाऱ्या भागात शेतकरी चिंतातूर झाला आहे. राज्यात पुढील आठवडाभर पावसाचे प्रमाण कमी राहणार असून, दुसऱ्या आठवड्यात पावसाला पुन्हा सुरूवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. (How will it rain in the future?) त्यामुळे शेतकऱ्यांना अजून पावसाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

 

कोकणासह नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या धो-धो पावसाने रत्नागिरी, रायगडसह, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूर स्थिती ओसरली. तर दुसरीकडे उत्तर मध्य महाराष्ट्रात यंदा अद्यापही चांगल्या पावसाची प्रतिक्षा कायम आहे. २९ जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्र, गुजरातसह पश्चिम किनारपट्टी आणि दक्षिण भारतात पावसाचे प्रमाण खुपच कमी झाले आहे. तर उत्तरेकडील राज्यात चांगल्या पावसाने हजेरी लावली आहे. महाराष्ट्राच्या चारही विभागात पावसात पुन्हा खंड पडला आहे. (How will it rain in the future?)

 

असा असेल येणाऱ्या आठवड्यात पाऊस
हवामान विभागाने जाहीर केलेल्या पुढील दोन आठवड्यांच्या अंदाजानुसार पहिल्या आठवड्यात (६ ते १२ ऑगस्ट) राज्यात पावसाची दडी कायम राहणार आहे. अनुकुल हवामान नसल्याने महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. कोकण, घाटमाथा आणि पश्चिम विदर्भात मात्र हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. (How will it rain in the future?)

Local ad 1