Maharashtra SSC 10th Result 2023 LIVE ।दहावीचा निकाल 93.83 टक्के लागला ; निकाल पहाण्यासाठी क्लिक करा

Maharashtra SSC 10th Result 2023 LIVE । मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वीं) परीक्षेचा निकाल (Secondary School Certificate (10th) Exam Result) शुक्रवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला  जाणार आहे. मात्र, तत्पुर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पत्रकार परिषद घेत निकाल जाहीर केला असून, 93.83 टक्के निकाल लागला आहे. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.11 टक्क्यांनी निकाल घटला आहे.  (ssc result 2023 live update. 10th result was 93.83 percent)    

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education Pune, Nagpur, Aurangabad, Mumbai, Click, Amravati, Nashik, Latur and Konkan) या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल अधिकृत सकेतस्थळांवर शुक्रवार, दिनांक ०२/०६/२०२३ रोजी दुपारी ०१.०० बाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.

 

 

अधिकृत संकेतस्थळावर पहा निकाल

2023
€ http:/l/mh10.abpmajha.com

 

      माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वीं) मार्च २०२३ परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्याध्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्यांच्या निकालाबरोबरच सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.
Local ad 1