लम्पी आजाराबाबत पशुपालकांनी पशुधनाची अशी घ्यावी काळजी !

नांदेड : नांदेड जिल्ह्यात नायगाव तालुक्यातील बरबडा, सोमठाणा या गावात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. यामुळे ही गावे बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी पशुवैद्यकिय विभागाकडून ग्रामपातळी पर्यंत नियोजन केले आहे. पशुपालकांनी पशुधनाची काळजी कशी घ्यावी याविषयी प्रत्यक्ष गावांना भेटी देवून तज्ज्ञामार्फत जागृती करण्यात येत आहे. (The cattle breeders should take care of the livestock about Lumpy disease!)

 

 

 

पशुपालकांनी आवश्यकतेप्रमाणे तात्काळ करावयाची कर्तव्य

गोठा व आसपासचा परिसर स्वच्छ ठेवा, शेण, लघवी, आणि सांडपाणी यांचा योग्य निचरा करावा जेणे करून गोठ्याची जागा स्वच्छ राहील. त्यामुळे माशा, डास, गोचिड व चिलटे, या रोग पसरविण्याऱ्या वाहकांचे प्रमाण कमी होईल. गोठ्यातील गाय बाधित असल्यास तिची व्यवस्था निरोगी जनावरांपासून वेगळी करावी. जनावरांची हाताळणी केल्यानंतर हात साबणाच्या पाण्याने धुवावेत किंवा सॅनिटायझरने साफ करावेत. बांधित जनावरांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीना व पशुवैद्य यांनी आपले कपडे, व साहित्य यांचे योग्य त्या द्रावणाने निर्जतुकीकरण करावे. रोगग्रस्त जनावर दगावल्यास त्याचे शरीर 8 फुट खोल खड्डा खणून त्यात पुरावे. नजिकच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्याने योग्य तो उपचार व लसीकरण करून घ्यावे. (The cattle breeders should take care of the livestock about Lumpy disease!)

 

हे करू नका

आजारी जनावरांचा शिल्लक राहीलेला चारा, पाण्याची भांडी तसेच औषधोपचारासाठी वापरलेले साहित्य निरोगी जनावरांसाठी वापरू नका. नविन गाय विकत आणली तर पाच आठवडे पर्यत तिचा समावेश कळपात करू नका. आजारी जनावरांचे दूध धारा सुरूवातीस काढू नका. आजारी जनावरांच्या गोठ्यात सर्वाना मुक्त प्रवेश नको. रोगाचा प्रादूर्भाव असलेल्या परिसरातून जनावरांची खरेदी विक्री करू नये असे आवाहन पशुवैद्यकीय विभाग यांनी केले आहे. (The cattle breeders should take care of the livestock about Lumpy disease!)

Local ad 1