(india vs england 3rd odi) पुण्यात भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये आज निर्णायक सामना
पुणे : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा व निर्णायक एकदिवसीय सामना रविवारी पुण्यातील गंहुजे येथील महाराष्ट्र क्रिकेट मंडळाच्या मैदानावर खेळला जाणार आहे. मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात सन्माजनक धावसंख्या करुनही भारताला पराभव पत्कारावा लागला. त्यात इंग्लंडच्या संघाने भारतीय संघाचा ६ गडी राखुन पराभव केला. इंग्लंड सामाना जिंकल्यामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. आजचा सामाना जिंकण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करणार आहेत. (india vs england 3rd odi)
इंग्लंडने या भारत दौऱ्यात एकदिवसीय मालिकेआधी कसोटी आणि टी-२० मालिका खेळली. या दोन्ही मालिका जिंकण्यात भारताला यश आले होते. त्यामुळे आता तिसरा एकदिवसीय सामना जिंकत मालिका विजयांची हॅटट्रिक साजरी करण्याचे भारतीय संघाचे लक्ष्य आहे. मात्र, दुसऱ्या सामान्याच फलंदाजी सुरेख झाली. परंतु गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली नाही. त्यामुळे या सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता आहे. (india vs england 3rd odi)
पहिल्या दोन सामन्यांत भारतीय संघ कुलदीप यादव आणि कृणाल पांड्या या फिरकी जोडगोळीसह खेळला होता. मात्र, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ केवळ एका फिरकीपटूसह खेळू शकेल. तसे झाल्यास टी.नटराजन किंवा मोहम्मद सिराजला अतिरिक्त वेगवान गोलंदाज म्हणून संधी मिळू शकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (india vs england 3rd odi)