नांदेड जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

नांदेड  : नांदेड जिल्ह्यात शनिवार 18 जून रोजी सकाळी 6 वाजेपासून ते शनिवार 2 जुलै 2022 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. (In Nanded district, a curfew order was imposed)

 

Maharashtra SSC 10th Result 2022 : दहावीच्या परिक्षेतही मुलीनी मारली बाजी,  96.94 टक्के निकाल लागला

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात शनिवार 18 जून 2022 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते शनिवार 2 जुलै 2022 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. (In Nanded district, a curfew order was imposed)

 

10th result | दहावीचा निकाल आज दुपारी ऑनलाईन जाहीर होणार ; ‘हे’ 5 स्टेप पूर्ण करा आणि निकाल पहा

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील. (In Nanded district, a curfew order was imposed)
Local ad 1