IAS Officers Transfer । राज्यातील 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

IAS Officers Transfer ।  राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये, सोलापूरच्या जिल्हा परिषद मुख्याधिकारी मनीषा आव्हाळे  (Solapur ZP Chief Officer Manisha Awhale)यांची बदली  पुणे येथील  स्मार्ट सिटीचे मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. (Manisha Awhale, Chief Executive Officer, Pune Smart City) दरम्यान, आव्हाळे यांच्यासह अभिनव गोयल, विनायक महामुनी, सतीशकुमार खडके, सौम्या चांडक, कुलदीप जंगम आणि प्रदीपकुमार डांगे यांचीही बदली करण्यात आली आहे. (IAS Officers Transfer 7 ias officer transfer in maharashtra)

 

शासनाने आपली बदली (transfer) केली असून, आपली नियुक्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, पुणे (Pune) या रिक्त पदावर केली आहे, असा आदेश मनीषा आव्हाळे यांना देण्यात आला आहे.  आपल्या जागी कुलदीप जंगम, भाप्रसे यांची नियुक्ती केली आहे. तरी आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार जंगम, भाप्रसे यांच्याकडे सोपवून, नवीन पदाचा कार्यभार त्वरीत स्वीकारावा, असे पत्र सामान्य प्रशासन विभागाच्य मुख्य सचिव व्ही. राधा (Chief Secretary of General Administration Department V. Radha) यांनी मनीषा आव्हाळे यांना पाठवले आहे. अभिनव गोयल यांची नियुक्ती हिंगोली जिल्हाधिकारी या पदावर करण्यात आली आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या अगोदर या अधिकाऱ्यांची बदली झाल्याने प्रशासकीय वर्तुळात त्यांची चर्चा रंगली आहे.

कोणाची कुठे झाली बदली

आयएएस विनायक महामुनी यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर या पदावर करण्यात आली (IAS Vinayak Mahamuni appointed as Chief Executive Officer, Zilla Parishad, Nagpur)

आयएएस सतीशकुमार खडके यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, बीड या पदावर करण्यात आली आहे. (IAS Satishkumar Khadke has been appointed Chief Executive Officer, Zilla Parishad, Beed.)

आयएएस सौम्या शर्मा चांडक मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी,स्मार्ट सिटी नागपूर या पदावर करण्यात आली आहे. (IAS Soumya Sharma Chandak Chief Executive Officer, Nagpur has been appointed as Chief Executive Officer, Smart City Nagpur.)

आयएएस मनीषा आव्हाळे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी, पुणे या पदावर करण्यात आली आहे. (IAS Manisha Awhale, Chief Executive Officer, Zilla Parishad, Solapur has been appointed as Chief Executive Officer, Smart City, Pune.)

आयएएस कुलदीप जंगम, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर या पदावर करण्यात आली. (IAS Kuldeep Jangam, Chief Executive Officer, Zilla Parishad Buldhana has been appointed as Chief Executive Officer, Zilla Parishad, Solapur.)

आयएएस प्रदीप कुमार डांगे यांची नियुक्ती आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, नवी मुंबई या पदावर करण्यात आली आहे. (IAS Pradeep Kumar Dange has been appointed as Commissioner, Skill Development, Employment and Entrepreneurship, Navi Mumbai.)

 

Local ad 1