राज्यातील चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या ; कंधारला मिळाले आयएएस टाॅपर अधिकारी

बुधवारी राज्यातील चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. त्यात बीड उपविभागीय अधिकारी असलेल्या आयएएस करिश्मा नायर (IAS Karisma Nair) यांची कंधार उपविभागाचे सहायक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

कंधार : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राज्यातील महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या 31 जानेवारी पूर्वी करायच्या आहेत. बुधवारी राज्यातील चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. त्यात बीड उपविभागीय अधिकारी असलेल्या आयएएस करिश्मा नायर (IAS Karisma Nair) यांची कंधार उपविभागाचे सहायक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. यामुळे कंधार तालुक्याला नायर यांच्या रुपाने टाॅपर आयएएस अधिकारी मिळाले. (Transfers of four IAS officers in Maharashtra)

 

 

राज्यातील चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यात 2021 च्या आयएएस अधिकारी असलेल्या व सध्या बीड उपविभागीय अधिकारी असलेल्या करिश्मा नायर (Karishma Nair, IAS (2021) ) यांची कंधार उपविभागीय कार्यालयाच्या सहायक जिल्हाधिकारी (Assistant Collector) म्हणून बदली करण्यात आली.

 

चांदवड उपविभागाचे सहायक जिल्हाधिकारी (Assistant Collector) पुलकित सिंग (Pulkit Singh, IAS 2021) यांची बुलढाणा उपविभागाचे सहायक जिल्हाधिकारी नियुक्ती करण्यात आली.

 

पुसद उपविभागाचे सहायक जिल्हाधिकारी सुहास गाडे (IAS (2021) द्रायपूर उपविभाग (Drayapur Sub Disivion), अमरावती या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.

 

बल्लारपूर उपविभागाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी मानसी (Mains, IAS 2021) यांची सहायक जिल्हाधिकारी, मलकापूर उपविभाग, बुलढाणा येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

 

Local ad 1