जळगाव जिल्हाधिकारीपदाचा आयुष प्रसाद यांनी स्वीकारला पदभार

जळगाव : पुणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून आयुष प्रसाद (IAS Ayush Prasad) यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. आयुष प्रसाद यांची पदोन्नतीने जळगाव जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे. (IAS Ayush Prasad assumed charge as Collector of Jalgaon)

 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आयुष प्रसाद यांनी जिल्हा परिषद कामकाजात अनेक सुधारणा केल्या आहेत. पदाधिकाऱ्यांच्या बरोबर त्यांनी आपले प्रशासकीय ‘कौशल्य’ अनेकदा दाखवले. खाते प्रमुख असो की, कर्मचारी तो सतत कामात ठेवून त्याच्याकडून अपेक्षित काम करून घेण्याचे कौशल्य हे भविष्यात कर्मचाऱ्यांना कर्तव्याची जाणीव करून देणारे होते. अर्थात प्रशासक राजवटीत कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागले. त्यात पदोन्नत्या आणि वेतनाशी संबंधित अनेक लाभ मिळवून देण्याचे मोठे काम केले आहे.

 

कोरोना महामारी, शरद भोजन, शैक्षणिक गुणवत्ता वाढ आणि शाळा सुधार कार्यक्रम, कुपोषण मुक्त जिल्हा अभियान. हंड्रेड डेज कार्यक्रम, शाहू फुले आंबेडकर अभ्यासिका, डीडीआरसी, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण, ग्रामपंचायत इमारती, शवदाहिनी, अशा अनेक योजनांचा ठसा आयष प्रसाद यांनी कारकिर्दीमध्ये उमटवला.

 

IAS Ayush Prasad assumed charge as Collector of Jalgaon

 

आता आयुष प्रसाद यांनी जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार समोवारी स्वीकारला आहे. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम (Naval Kishore Ram) यांची दिल्ली येथे उपसचिव पदावर बदली झाली. त्यावेळी त्यांच्या पदभार जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी 10 ते 15 दिवस पुणे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी कामकाज पाहिले आहे. (IAS Ayush Prasad assumed charge as Collector of Jalgaon)

Local ad 1