Breaking News । सहाय्यक पोलीस आयुक्ताने पत्नी, पुतण्यावर गोळ्या झाडल्या, स्वतःवरही गोळी झाडून केली आत्महत्या

पुणे : शहरात बाणेर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भरत गायकवाड (Bharat Gaikwad, Assistant Commissioner of Police, Amravati Police Force)यांनी पत्नीचा आणि पुतण्याचा गोळी झाडून खून केला. त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून आपलं जीवन संपवलं. ही घटना मध्यरात्री 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. (Assistant Commissioner of Police committed suicide by shooting his wife, nephew and himself)

 

 

 

मोनी गायकवाड (Moni Gaikwad) (वय 44), पुतण्या दीपक गायकवाड (Deepak Gaikwad) (वय 35) अशी गोळी झाडून खून केलेल्या दोघांची नावे आहेत. तर भारत गायकवाड यांनी स्वतःवर गोळी झाडून आपलं जीवन संपवलं. (Assistant Commissioner of Police committed suicide by shooting his wife, nephew and himself)

 

घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. भारत गायकवाड हे अमरावती पोलीस दलात सहायक आयुक्त म्हणून कार्यरत होते.तर त्यांचे कुटुंबीय पुण्यात वास्तव्याला होते.

Local ad 1