IAS आयुष प्रसाद यांनी निरोपसमारंभात मांडला विकासकामांचा पट

पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयएएस आयुष प्रसाद यांची जळगाव जिल्हाधिकारी (Jalgaon Collector Ayush Prasad) म्हणून पदोन्नतीने बदली झाली. त्यांना जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने शनिवारी निरोप देण्यात आला. निरोप समारंभात आयुष प्रसाद यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांचा पट मांडला. त्यात केलेल्या कामकाजाविषयी सूचना केल्या. तर पूर्ण झालेल्या  कामात चुका काढण्यापेक्षा त्यात सुधारणा कशी करता येईल, याचा विचार व्हावा, असे आवाहन आयुष प्रसाद यांनी केले आहे. (IAS Ayush Prasad presented the development works)

 

 

IAS Ayush Prasad

 

आयुष प्रसाद समारंभाला उत्तर देताना काय म्हणतील, या विषयी उपस्थितांना उत्सुकता होती. ते म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शाळांच्या गुणवत्तेत वाढ (Increasing the quality of Zilla Parishad schools) करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखला, आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावरही भर दिला. मी माझ्या कार्यकाळात काही महत्वाची कामे पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला. त्यात काही प्रमाणात यशस्वीही झालो. तर काही अपूर्ण आहेत. त्यामध्ये खानवडी शाळा आणि कोरोनामध्ये मृत्यू झालेल्या कर्मचाच्यांचे स्मारक अपूर्ण आहे. कामामध्ये चुका काढण्यापेक्षा ती कामे पुढे घेऊन जाणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

 

 

निरोप समारंभ कार्यक्रमास  जिल्हा परिषदेच्या  माजी अध्यक्षा निर्मला पानसरे (Former President of Zilla Parishad Nirmala Pansare), माजी सभापती बाबुराव वायकर, आतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक शालिनी कडू, डॉ. इंद्राणी मिश्रा, उपमुख्यकारी अधिकारी सचिन घाडगे (Additional Chief Executive Officer Chandrakant Waghmare, Project Director Shalini Kadu, Dr. Indrani Mishra) आदी उपस्थित होते.

 

प्रसाद म्हणाले,  जिल्हा परिषदेची सर्वाधिक बदनामी ही कचच्यामुळे होते. त्यामुळे ग्रामपंचायतींना कचरामुक्त करून दाखवायचे होते, परंतु माझ्याकडून काम हे पूर्ण झालेले नाही, याची खंत मनात कायम राहील.  कोरोनात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे स्मारकाचे काम अपूर्ण असून, ते लवकरच पूर्ण होईल, अशी अपेक्षाही व्यक्त केली. 42 कर्मचाच्यांचा कोरोनामध्ये मृत्यू झाले, ते माझ्या एका सहीने कामास गेले होते. कोरोनात त्यांनी इतरांचे जीव वाचवले. या कर्मचाऱ्यांनी आपल्या जिवाची पर्वा केली नाही. त्या कर्मचान्यांच्या मृत्यूमुळे मला नेहमी दुःख होते, असे आयुष प्रसाद म्हणाले.

 

IAS Ayush Prasad

 

एक आठवण आणि सभागृह शांत

सीईओ म्हणून आयुष प्रसाद हे कर्मचारी आधिकाऱ्यांना सांभाळून घेत होते. तर त्यांनी  ग्रामीण भागातील नागरिकांना सोयी सुविधा देण्यासाठी अनेक योजना, उयापयोजना केल्या आहेत. जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी मोहिमेत अनेक विद्यार्थ्यांना गंभीर आजार असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात आले.  शनिवारी सकाळी एक अनोळखी फोन आला. “साहेब मी तुम्हाला ओळखत नाही, पण फोन नंबर मिळवून तुम्हाला फोन केला. मला किंवा आमच्या कुटुंबीयांना माहिती नव्हतं की आमच्या बाळाला हृदयाचा त्रास आहे. तुमच्यामुळे जिल्हा परिषदेकडून बाळाच्या झालेल्या आरोग्य तपासणीमध्ये हृदयाचा आजार कळला आणि त्यावर तुमच्याकडून चांगल्या प्रकारे उपचार झाले,अशी आठवण आयुष प्रसाद यांनी सांगितली.

 

 

Local ad 1