Pune Bus Fire : भीमाशंकर जवळ ट्रॅव्हल्स जळून खाक ; प्रवासी सुखरूप

Pune Bus Fire : नाशिक येथील बस दुर्घटनेत  प्रवाशांना आपला जीव गमावा लागला घटना ताजी असतानाच पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे येथेही खाजगी बस जळूनखाक झाली, ही घटना आज सकाळी सहा वाजता सुमालास घडली. या दुर्घटनेत ट्रॅव्हल्स मधील प्रवासी सुखरूप आहेत. (Travels burned near Bhimashankar; Passengers are safe)

 

घोडेगाव जवळील पिंपळगाव घोडे गावच्या हद्दीत भिवंडी येथून श्री क्षेत्र भीाशंकरकडे निघालेल्या महिलांच्या बसला आग लागून संपूर्ण बस खाक झाली. भिवंडी पाये गावातील २६ महिला रात्री अकरा वाजता भीमाशंकर कडे निघाल्या. सकाळी साडेसहाच्या सुमारास घोडेगाव च्या पुढे गाडी आली असता बाजूने जाणाऱ्या एसटी बस चालकाला ट्रॅव्हल्समधून धूर निघत असल्याचे लक्षात आले,  त्याने ही माहिती चालकाला दिली.  (Travels burned near Bhimashankar; Passengers are safe)

 

चालकाने गाडी बाजूला लावली असता गाडीने खालून पेट घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर चालकाने ट्रॅव्हल्स मध्ये सर्व महिला प्रवाशांना तातडीने खाली उतरवले .  काही क्षणात संपूर्ण बस जळू लागली. हळूहळू संपूर्ण बस जळून खाक झाली. यावेळी स्थानिक नागरिकांनी घटना स्थळी धावा घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले होते त्यामुळे महिलांना बसमधील साहित्यही काढता आले नाही (Travels burned near Bhimashankar; Passengers are safe)

Local ad 1