Nanded ACB Trap । आरटीई अर्जात गुगुलचे लोकेशन चुलके अन् गुरूजींनी मागितली 25 हजारांची लाच

 

Nanded ACB Trap नांदेड : शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना एकूण प्रवेशाच्या 25 टक्के जागा ह्या राखीव असतात. त्यानुसार प्रवेश दिला जातो. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो. त्यात पालकाचे वार्षिक उत्पन्न, गुगल लोकेशन (Google Location) टाकावे लागते. त्यानंतर ज्यांना ऑनलाइन लॉटरीमध्ये ज्यांचे नाव आले आहे. त्यांना मोफत प्रवेश दिला जातो. त्यापूर्वी प्रवेसाठी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी शिक्षण विभागामार्फत केली जाते. त्यात असलेल्या त्रुटींची पूर्तता पालकांना करावी लागते. (Guruji demanded a bribe of 25  thousand to correct the error in the RTE application)

 

नांदेड पंचायत समितीमध्ये शिक्षण विभागात सध्या कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. एका पालकाने भरलेल्या अर्जात गुगुल लोकेशन जुळून येत नव्हते. त्यामुळे मूळचे शिक्षक असलेला परंतु सध्या शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या गुरुजीने त्रुटीची पूर्तता करण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच मागितली. (Guruji demanded a bribe of 25  thousand to correct the error in the RTE application)

 

तडजोडीनंतर 20 हजार रुपये पंचासमक्ष स्वीकारण्याचे कबूल केले. त्यामुळे गुरुजी विरोधात वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रल्हाद बळीराम खुडे (सहशिक्षक आंबेडकर प्राथमिक शाळा, बळीरामपुर. ता. जि. नांदेड) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. (Guruji demanded a bribe of 25  thousand to correct the error in the RTE application)

Local ad 1