Gram Panchayat Election : उमेदवारी अर्ज प्रत्यक्ष भरता येणार, वेळेतही मुदतवाढ

Gram Panchayat Election : राज्य निवडणूक आयोगाच्या (State Election Commission) निर्देशानुसार सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुकांना नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या संगणक प्रणालीद्वारे तांत्रिक बिघाड निर्माण झाले आहेत. त्यामुळे इच्छुकांची एकच धावपळ सुरू झाल्याने निवडणूक आयोगाने नामनिर्देशन अर्ज पारंपरिक पद्धतीने करण्यास मुभा दिली असून त्यासाठी उद्या (दि.2) सायंकाळी 5.30 वाजेपर्यंतचा कालावधी वाढविण्यात आला आहे.(Gram Panchayat Election : Nomination form can be filed through traditional method, time also extended)

राज्यातील सात हजार 751 ग्रामपंचायत मधील सार्वत्रिक निवडणुकींचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार 28 नोव्हेंबरपासून ते 2 डिसेंबर, दुपारी 3 वाजेपर्यंत इच्छुकांना नामनिर्देशन अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याबाबत सुविधा प्राप्त करून दिली आहे.  (Gram Panchayat Election: Nomination form can be filed through traditional method, time also extended)

 

निवडणूक आयोगाच्या प्रणालीवर जाऊन नामनिर्देशन अर्ज भरण्याबाबत सूचना केली होती. परंतु, मागील दोन दिवसांपासून निवडणूक आयोगाच्या प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने ही अनेक इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू आहे, तर अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त करत निवडणूक आयोगासोबत पत्रव्यवहार करून पारंपरिक पद्धतीने नामनिर्देशन अर्ज भरण्यास मुदत देण्यात यावी, अशी मागणी केली होती.

 

त्यानुसार निवडणूक आयोगाने दखल घेत, कोणताही व्यक्ती निवडणुकीपासून वंचीत राहू नये, म्हणून संगणकीय प्रणालीबरोबरच पारंपरिक पद्धतीने (हस्तलिखित) नामनिर्देशन अर्ज भरण्यास मुभा देत उद्या दुपारी 3.00 ऐवजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंतचा वेळ देखील वाढवून दिली असल्याचे परिपत्रकाद्वारे नमूद केले आहे. (Gram Panchayat Election : Nomination form can be filed through traditional method, time also extended)
Local ad 1