नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर

नांदेड : राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) दिलेल्या माहितीनुसार, पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध 51 तालुक्यांतील 608 ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी (General elections for the post of Sarpanch) 18 सप्टेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून ,19 सप्टेंबर 2022 रोजी मतमोजणी होणार आहे. (Gram Panchayat Election Announced in Nanded District)

 

 

नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाले. तालुकानिहाय संख्या
नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाले. तालुकानिहाय संख्या

नांदेड जिल्ह्यातील 9 तालुक्यातील 94 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक किनवट तालुक्यातील 47, माहूर 24, नायगांव 4, लोहा 5, कंधार 4, मुखेड 5, मुदखेड 3, अर्धापूर आणि देगलूर तालुक्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. (Gram Panchayat Election Announced in Nanded District)

 

 

आचारसंहितेचा कामांना बसणार फटका

ग्रामपंचायत निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे खासदार,आमदारांना विकास कामांचे उद्घाटन, भूमिपुजन करण्यास बंदी असणार आहे. (Gram Panchayat Election Announced in Nanded District)
Local ad 1