नांदेड जिल्ह्यात जात प्रमाणपत्र देण्यासाठी मंडणगड पॅटर्न, काय आहे पॅटर्न ?
Mandangad pattern नांदेड : जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळेत मिळत नाही. त्यामुळे प्रवेश घेण्यास अडचण निर्माण होते. आता जिल्ह्यात तालुकानिहाय महाविद्यालयस्तरावर शनिवार 3 डिसेंबर 2022 रोजी एक दिवसीय जात वैधता प्रमाणपत्र वाटप व मार्गदर्शन शिबीराचे (Caste Validity Certificate Distribution Camp) आयोजन करण्यात आले आहे.हा मंडणगड पॅटर्न असून, नांदेड जिल्ह्यातही राबविण्यात येत आहे. (Mandangad pattern for issuing caste certificate in Nanded district what is the pattern?)