ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च सादर केला आहे का ? नसेल तर तात्काळ करा..
नांदेड : नांदेड जिल्ह्यात 18 डिसेंबर 2022 रोजी नांदेड जिल्ह्यातील 181 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका (General Elections) पार पडल्या. या निवडणुकीचा निकाल 23 डिसेंबर रोजी जाहीर झाला. या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांनी निवडणुकीत झालेला खर्च वेळेत सादर करणे आवश्यक आहे.अन्यथा पुढील सहा वर्षांसाठी कोणतीही निवडणूक लढविता येणार नाही. त्यामुळे तात्काळ सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. (Has the Gram Panchayat election expenses been submitted?)
Related Posts
या ग्रामपंचायत निवडणुकीतील खर्चाचा हिशोब (Computation of Gram Panchayat Election Expenditure) सादर न करणाऱ्या उमेदवांरावर अपात्रेची कारवाई निवडणूक शाखेकडून सुरू केली जाणार आहे. हिशोब सादर करण्याची अंतिम मुदत ही येत्या 20 जानेवारी 2023 रोजी संपत आहे. या दिनांका पुर्वी हिशोब सादर न करणाऱ्या उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई केली जाईल. यातील गांभीर्य लक्षात घेवून ग्रामपंचायत निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब तातडीने उमेदवारांनी सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. (Has the Gram Panchayat election expenses been submitted?)
या निवडणुकीत सदस्यपदासह थेट सरपंच पदाच्या 1 हजार 572 जागांसाठी 2 हजार 706 उमेदवारांनी निवडणूक लढविली आहे. तसेच 375 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. निवडणूक लढविणाऱ्या व बिनविरोध निवडून आलेल्या एकूण 3 हजार 81 उमेदवारांनी त्यांचा निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब 20 जानेवारी 2023 पर्यंत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी अथवा तहसील कार्यालयात प्रतिज्ञापत्रासह जमा करणे आवश्यक आहे. (Has the Gram Panchayat election expenses been submitted?)
खर्चाचा हिशेब प्रतिज्ञापत्रासह सादर न करणाऱ्या उमेदवारांना अपात्र करण्याबाबतची कार्यवाही जिल्हा प्रशासनामार्फत तातडीने सुरू करण्यात येणार आहे असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
(Has the Gram Panchayat election expenses been submitted?)