जामखेडमध्ये अकरा प्रतिष्ठीतांविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील घटना

 

अहमदनगर : अहमदनगरच्या जामखेड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जामखेड शहरातील अकरा प्रतिष्ठीतांविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेेत. आरोपींमध्ये प्रतिष्ठीत व्यापाऱ्यांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. (Fraud cases filed against eleven dignitaries in Jamkhed) 

 

 

 

जामखेड येथील विवेक नेटके यांनी यासंदर्भात जामखेड पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Fraud cases filed against eleven dignitaries in Jamkhed)

 

 

खोटे नकाशे देऊन ले आऊट मंजुरीचे मोठे प्रकरण जामखेडमधूून समोर आले आहे. जामखेड येथील भूमी अभिलेख कार्यालयाकडील मोजणी रजिस्टर क्रमांकाचा मूळ नकाशा सादर न करता पावतीच्या आधारे नकाशा तयार करून तो नगररचना कार्यालयात दाखल करुन जामखेड नगरपरिषदेेकडून त्या जागेच्या ले आऊटला मंजुरी मिळाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

 

 

या प्रकरणी नगररचना कार्यालयासह भूमी अभिलेख, नगरपरिषदेची फसवणूक केल्याची फिर्याद जामखेड पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे.

 

 

विवेक नेटके यांच्या फिर्यादीवरून 11 प्रतिष्ठीतांविरोधात जामखेड पोलिस स्टेशननला कलम 420 आणि विविध कलमानुसार फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आल्याने जामखेड शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास जामखेड पोलिस करत आहेत.

 

 

 

या प्रकरणात दिलीप हरकचंद गुगळे, सुनील मनसुखलाल कोठारी, प्रमोद धनराज बोगावत, तात्याराम रोहिदास पोकळे, सागर गुरुलिंग मिटकरी, अनंत विलास चिंतामणी,अमोल विलास चिंतामणी, कीर्ती अमोल चिंतामणी, शीला अनंत चिंतामणी, संतोष पोपटलाल फिरोदिया आणि सौरभ नामदेव शिंदे यांचा समावेश आहे.

Local ad 1