मुहूर्त ठरला ! तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण झाले जाणून घ्या

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल. (Fadnavis holds the post of guardian minister of six districts and who is named as the guardian minister of Nanded) 

 

 

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराला लागलेला विलंब, त्यानंतर पालकमंत्री नियुक्ती ही रखडली होती. त्यामुळे अनेक विकासकामे रखडली. मुख्यमंत्री शिंदे यांनी पालकमंत्री पदांची यादी प्रसिद्ध केली आहे. (Fadnavis holds the post of guardian minister of six districts and who is named as the guardian minister of Nanded)

इतर पालकमंत्र्यांची नावे

राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर,

सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया,

चंद्रकांत दादा पाटील- पुणे,

विजयकुमार गावित- नंदुरबार,

गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड,

गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव

दादा भुसे- नाशिक,

संजय राठोड- यवतमाळ, वाशिम

सुरेश खाडे- सांगली,

संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

उदय सामंत- रत्नागिरी, रायगड,

तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)

रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,

अब्दुल सत्तार- हिंगोली,

दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर,

अतुल सावे – जालना, बीड,

शंभूराज देसाई – सातारा, ठाणे,

मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर

Local ad 1