Maharashtra Politics LIVE : विधानसभेच्या अध्यक्षपदी राहूल नार्वेकर, आजपर्यंतचे अध्यक्ष आणि कालावधी जाणून घ्या..

Maharashtra Politics LIVE : महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ज्येष्ठ सदस्यांनी नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांना अध्यक्षीय आसनावर विराजमान केले आहे. आजपर्यंत झालेल्या अध्यक्ष आणि त्यांचा कार्यकाळ जाणून घेऊया… (Rahul Narvekar Virajma as the Speaker of the Legislative Assembly)

 

 

विधानसभेचे आजपर्यंत झालेले अध्यक्ष आणि त्यांचा कालावधी

 

भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी मैदानात होते. नार्वेकर यांनी बाजी मारली असून, ते राज्याच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत. शिरगणती केल्यानंतर नार्वेकर यांना 164 मते मिळाली. तर राजन साळवी यांना 107 मतांवर समाधान मानावे लागले. समाजवादी पक्ष आणि एआयएमचे आमदार या मतदानात तटस्थ राहिले. एकूण तीन आमदार तटस्थ राहिले. (Rahul Narvekar Virajma as the Speaker of the Legislative Assembly)

 

 

राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड करावी असा प्रस्ताव चंद्रकांत पाटील यांनी मांडला. त्याला गिरीश महाजन यांनी अनुमोदन दिले. तर चेतन तुपे यांनी साळवी यांचा प्रस्ताव मांडला, तर संग्राम थोपटे यांनी अनुमोदन दिले. नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अध्यक्षांची निवड झाली आहे.  (Rahul Narvekar Virajma as the Speaker of the Legislative Assembly)

 

राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याने विधानमंडळावर सासरे आणि जावयांचे राज्य आले आहे. विधानसभेत जावई राहुल नार्वेकर तर विधानपरिषदेत त्यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर हे सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत. (Rahul Narvekar Virajma as the Speaker of the Legislative Assembly)

Local ad 1