Dr.Vishwas Mehendale passed away । डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे निधन

Vishwas Mehendale : आकाशवाणी विश्र्वास मेहेंदळे आपल्याला बातम्या देत आहे, असा आवाज दिल्ली आकाशवाणी केंद्रावरुन 1966 मनध्ये पहिल्यांदा ऐकला होता. त्यानंतर व्याख्यानातून ऐकायला मिळत होता. मात्र, आता तो कायमचा म्यूट झाला. ज्येष्ठ माध्यमकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे (Vishwas Mehendale) यांचे निधन झाले. त्यांनी वयाच्या 84 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. (Dr.Vishwas Mehendale passed away)

 

 

 

 विश्वास मेहंदळे वृत्तनिवेदक, लेखक, अभिनेते ही होते. अनेक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यासोबतच 18 हून अधिक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. याव्यतिरिक्त मराठी नाट्यसृष्टीचे भाष्यकार म्हणून ही ते ओळखले जायचे. (Dr.Vishwas Mehendale passed away)

ज्येष्ठ माध्यमकर्मी अशी ओळख असणारे विश्वास मेहेंदळे यांनी सुरुवातीच्या काळात पुण्याच्या आणि कुलाब्याच्या वेधशाळेमध्ये काहीकाळ नोकरी केली होती. त्यानंतर त्यांची मीडियासंबंधी कारकीर्द दूरदर्शनवर वृत्तनिवेदक म्हणून सुरू झाली. ते महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचे संचालकही होते. तसेच, पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन विभागाचे खातेप्रमुख होते. ‘सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया आणि कम्युनिकेशन’चे ते संस्थापक होते.

 

सृजन फाउंडेशननं महाराष्ट्र राज्यनिर्मितीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्तानं पुण्यात 1-3 ऑक्टोबर 2010 या काळात भरविलेल्या नाट्यसंमेलनाचं अध्यक्षपद डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी भूषवले होते. (Dr.Vishwas Mehendale passed away)

Local ad 1