साहित्य संमेलनावर कोटयावधीची उधळण, मग कवींसाठी पैसे संपतात का? रवी भिसे यांचा सवाल..
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2023 पुणे : अखिल भारतीय साहित्य संमेलन विविध वादामुळे चर्चा होत असते. परंतु यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महात्मा गांधी यांचे वास्तव्य लाभलेल्या वर्धा येथे होणार आहे. साहित्य संमेलनात कविता सादर करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा असते. परंतु कवींना पदरमोड करुन प्रवास करावा लागतो. त्यावर ‘माझा निषेध झाला पाहिजे’चे कवी रवी भिसे यांनी थेट सवाल उपस्थित केला आहे. (Literary conferences, spending crores, then money for poets? Question by Ravi Bhise)
रवी भिसे यांनी फेसबुवकर एक पोस्ट केली. ती जशीच्या तशी..
“संमेलनावर #5_ते_10_कोटी खर्च करता, मग काव्य वाचनासाठी निवड झालेल्या नव-कवीं, लेखकांना प्रवास खर्च देणे परवडत नाही का? साहित्य संमेलन हे फक्त साहित्यातील प्रस्थापितांसाठीच असतात का? साहित्यिकच नव-लेखकांचा विचार करणार नाहीत तर मग #साहित्य_संमेलनाचं बुजगावणं कशासाठी? (Literary conferences, spending crores, then money for poets? Question by Ravi Bhise) #अखिल_भारतीय_मराठी_साहित्य_संमेलन_वर्धा येथे कविता पाठवली तिची निवड झाली. परवा आयोजकांतर्फे कॉल व मेल आला. “आपल्या कवितेची निवड झाली आहे आपण उपस्थित रहावे” मी राहतो पुण्यात, पुणे ते वर्धा AC 3 Tier ट्रेनचे तिकीट आहे 1200 रुपये, दोन्ही वेळचे तिकीट 2400 रुपये.(निवड झालेले कवी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणार आहेत.) हिशेब पाहता सहज विचारणा केली की, “निवड झालेल्या कविंना आपण गाडीभाडे देणार आहात का?” तर आयोजकांकडून उत्तर आले की, “खर्च कवींनी स्वतः करायचा आहे..” या आधीच्या साहित्य संमेलनात काव्य वाचनासाठी निवड झालेल्या काही कवींशी बोललो तर त्यांनी देखील हाच अनुभव सांगितला. एका #साहित्य_संमेलनासाठी साधारण 5 कोटी रुपये खर्च केले जातात. त्यात प्रस्थापित, निमंत्रित कवींना मानधन दिले जाते. मग निवड झालेल्या नव कवींना गाडीभाडे दिले तर असा किती बोजा आयोजकांवर पडणार आहे?(Literary conferences, spending crores, then money for poets? Question by Ravi Bhise) नव लेखक कविंच्या आर्थिक हेटाळणीची सुरुवात ही अशा प्रकारे, ते ही साहित्य संमेलनातून होणार असेल तर विचार करायला हवा. साहित्यावर तासनतास निव्वळ भपकेबाजी करून काही होणार नाही नवलेखक कवींना सन्मान द्यायला शिका…” रवी भिसे, पुणे