मोठी बातमी : रोहित पवार क्रिकेटच्या मैदानावर..

पुणे : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) च्या (Maharashtra Cricket Association) अध्यक्षपदी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची निवड करण्यात आली. रोहित पवार यांनी स्वतः ही माहिती सोशल मिडियावर दिली. (Rohit Pawar as President of Maharashtra Cricket Board)

पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर पार पडलेल्या कमिटीच्या बैठकीत त्यांची निवड करण्यात आली आहे. रोहित पवार यांच्यासोबतच उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सचिवपदी शुभेंद्र भांडारकर, खजिनदारपदी सांगलीचे संजय बजाज आणि सह सचिव संतोष बोबडे यांची निवड करण्यात आली. (Rohit Pawar as President of Maharashtra Cricket Board)

 

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यपदाच्या निवडणुकीत रोहित पवार यांचा क्लब गटाकडून विजय झाला. असोसिएशनच्या बैठकीत सर्वप्रथम रोहित पवार यांना एमसीएच्या 16 सदस्यीय समितीत सामील केले गेले. त्यानंतर असोसिएशनचे अध्यक्षपद सोपवण्यात आले. (Rohit Pawar as President of Maharashtra Cricket Board)

Local ad 1