Diwali festival। शिधापत्रिकाधारकांची दिवाळी होणार गोड, मिळणार साखर

नांदेड : दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांची दिवाळी (Diwali festival) गोड करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, केवळ 100 रुपयांमध्ये शिधा किट मिळणार आहे, नांदेड जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारकांसाठी शासनाने ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर (October, November and December) 2022 या तीन महिन्यासाठी प्रतिमाह एक किलो साखर नियतन मंजूर केले आहे. (Diwali will be sweet for ration card holders, they will get sugar)

 तीन महिन्यासाठी शासनाकडून 2 हजार 138 क्विंटल साखर प्राप्त झाली आहे. पुढीलप्रमाणे तालुकानिहाय साखर नियतन देण्यात आले आहे. नांदेड तालुक्यासाठी 235 , अर्धापूर 22.50, मुदखेड 27, कंधार 95.50, लोहा 52, भोकर 98, उमरी 67, देगलूर 134.50, बिलोली 114.50, नायगाव 40, धर्माबाद 74.50, मुखेड 202, किनवट 467.50, माहुर 207, हदगाव 203, हिमायतनगर 98 एकूण 2 हजार 138 नियतन साखर नांदेड जिल्ह्याला प्राप्त झाली आहे. (Diwali will be sweet for ration card holders, they will get sugar)
सर्व अंत्योदय लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानातून वरील तीन महिण्याच्या साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे. (Diwali will be sweet for ration card holders, they will get sugar)
Local ad 1