Cabinet decision | एक कोटी 70 लाख कुटुंबांची दिवाळी होणार गोड ; शिंदे सरकार देणार शंभर रुपयात दिवाळी पॅकेज

Cabinet decision | दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना (Ration card holders) शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ 100 रुपयात देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet meeting) घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) होते. (One crore 70 lakh families will have a sweet Diwali)

संचामध्ये प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना प्रती १ किलोच्या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर पामतेल याचा समावेश असेल. (One crore 70 lakh families will have a sweet Diwali)
 राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे 7 कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे.  हा संच एक महिन्याच्या कालावधीकरिता देण्यात येऊन त्याचे वितरण ई-पॉस प्रणालीद्धारे करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण ४८६ कोटी ९४ लाख खर्चास देखील मान्यता देण्यात आली. (One crore 70 lakh families will have a sweet Diwali)
 सदरहू शिधावस्तूंचा संच दिवाळी पूर्वी वाटप व्हावा त्याचप्रमाणे कुठल्याही तक्रारी येऊ नये याची खबरदारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis)
यांनी दिल्या. (One crore 70 lakh families will have a sweet Diwali)
Local ad 1