...

भाजपचे माजी मंत्री बाबनराव लोणीकर यांच्या अपमानास्पद वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध

किसानांच्या सन्मानासाठी काँग्रेसचे पुण्यात आंदोलन

पुणे : भाजपचे आमदार व माजी मंत्री बाबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या अपमानास्पद, अविवेकी आणि हिणकस वक्तव्याचा निषेध करण्यासाठी पुणे जिल्हा युवक काँग्रेसने तीव्र आंदोलन केले. या वक्तव्यामुळे केवळ शेतकरी नव्हे, तर संपूर्ण राज्याचा अपमान झाल्याची भावना काँग्रेसने व्यक्त केली. (congress protests babanrao lonikar insulting remarks on farmers)

पुणे महापालिकेचे क्रीडा धोरण तयार करण्याचे काम सुरू | PMC Sports Policy

जिल्हाध्यक्ष उमेश पवार यांनी म्हटले की, “बाबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी. भाजपनेही आपली स्पष्ट भूमिका मांडावी आणि राज्यपाल व मुख्यमंत्री यांनी त्वरित कारवाई करावी.”

राजकारण करा, पण मर्यादा पाळा – मस्तानी प्रकरणावर खसादार मेधा कुलकर्णींचा टोला

या आंदोलनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीरंग चव्हाण पाटील, अक्षय जैन, लहू अण्णा निवंगुणे, शंकरराव दांगट पाटील, मिलिंद पोकळे, संजय अभंग, अजय खुडे, आबा जगताप आदींसह अनेक कार्यकर्ते आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

मोठी बातमी : पुणे शहरातील ११ हजार पथविक्रेत्यांना बिल आकारणी होणार

श्रीरंग चव्हाण पाटील म्हणाले, “शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्रात स्थान नाही. जर माफी मागितली नाही तर काँग्रेस रस्त्यावर उतरून लढा उभारेल.” या आंदोलनातून काँग्रेसने पुन्हा एकदा दाखवून दिलं की शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी त्यांचा लढा अखेरपर्यंत सुरू राहणार आहे.

Local ad 1