नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे तत्कालीन अपर आयुक्त रामनारायण गगराणी यांच्यासह पत्नी, मुलालाही एसीबीने केली अटक ; गगराणी कुटुंबियाकडे मिळाले घबाड !
Nanded Crime News : नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे तत्कालीन अपर आयुक्त रामनारायण लक्षीनारायण गगराणी यांना नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी पुण्यातून अटक केली ?. गगराणी यांना अटक का केली, गगराणी कुटुंबियांनी किती बेहिशोबी मालमत्ता जमवली याचा खुलासा नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केला आहे. (Nanded Anti-Corruption Department Arrested by Additional Commissioner of Nanded Waghala Municipal Corporation Ram Narayan Laxminarayan Gagrani on Friday in pune)
आरोपी लोकसेवक रामनारायण लक्ष्मीनारायण गगराणी (वय ६२ वर्ष, व्यवसाय तत्कालीन अपर आयुक्त, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड सध्या सेवानिवृत्त रा. शारदानगर नांदेड), पत्नी जयश्री रामनारायण गगराणी आणि मुलगा प्रथमेश रामनारायण गगराणी यांच्या विरूद्ध चौकशी करणारे चौकशी अधिकारी लाचलुचपतप्रतिवंधक विभागाचे उप अधीक्षक राजेंद्र पाटील यांच्या फियादीवरून वजिराबाद पोलीस स्टेशनमध्ये गुरनं ३८७/ २०२२ कलम १३ १) ई) सह १३ (२) भ्रष्याचार प्रतिबंध अधिनियम १९८८ व सह कलम १०९ भारतीय दंडसंहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Arrested by the then Additional Commissioner of Nanded Waghala Municipal Corporation Ram Narayan Laxminarayan Gagrani)
ही कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ. राजकुमार शिंदे (Superintendent of Police Dr. Rajkumar Shinde), अपर पोलीस अधीक्षक धरमसिंग चव्हाण, पोलीस उप अधीक्षक शामसुंदर याक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधिक्षक राजेंद्र पाटील,पोरकों अंकृश गाडेकर, ईश्वर जाधव, चापोना गजानन राऊत यांनी केली. गुन्हयाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अशोक इप्पर हे करीत आहेत. (ACB arrested then Additional Commissioner of Nanded Waghala Municipal Corporation Ram Narayan Gagrani)
लाचेची मागणी झाल्यास करा संपर्क
येथे करा संपर्क
Web title : ACB arrested then Additional Commissioner of Nanded Waghala Municipal Corporation Ram Narayan Gagrani