इर्शाळगडवाडी येथील दुर्घटनाग्रस्त नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाने केले मदतीचे आवाहन ; बँक खाते नंबर जाहीर
अलिबाग : खालापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे चौक- नानिवली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील इर्शाळवाडी ता. खालापूर (Irshalwadi Khalapur) येथे बुधवारी रात्री दरड कोसळून मोठ्याप्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यात पशुधनाची व खाजगी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. अशावेळी त्यांना आधार देवून आयुष्यात पुन्हा उभारी घेण्यासाठी समाजातील सामाजिक संस्था / ट्रस्ट / फाँऊंडेशन्स / सीएसआर / दानशूर व्यक्ती (Social Organizations, Trusts, Foundations, CSR, Philanthropists) यांच्याकडून आर्थिक मदत व साहित्याच्या स्वरुपात मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पुढील खाते नंबर व पत्ता उपलब्ध करुन देण्यात येत आहे. (Appeal for help to Irshalgadwadi accident victims)
ज्यांना आर्थिक स्वरुपात मदत करावयाची आहे त्यांनी खात्याचे नाव : जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी (District Disaster Response Fund),
बँकचे नाव : स्टेट बँक ऑफ इंडिया, मुख्य शाखा, अलिबाग (State Bank of India, Alibag), बँक खात्याचा नंबर : 38222872300,
IFSC Code : SBIN0000308या बँक खात्यामध्ये निधी जमा करावा.
ज्यांना साहित्य स्वरुपात मदत करावयाची आहे त्यांनी उपविभागीय अधिकारी, कर्जत अजित नैराळे (Sub Divisional Officer, Karjat Ajit Nairale),मो.8390090040, खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी (Khalapur Tehsildar Ayub Tamboli), मो.क्र.9975751076 यांच्याशी संपर्क करुन ठिकाणी मदत पोहोच करावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के (Resident Deputy Collector Sandesh Shirke)यांनी कळविले आहे.