अखिल भारतीय साहित्य संमेलन अमळनेर येथे होणार

पुणे : आगामी ९७ वे साहित्य संमेलन (Akhil Bharatiya Sahitya Sammelan) कुठे होणार याविषयी चर्चा सुरु होती.  साहित्य महामंडळाच्या बैठकीत संमेलनाचे ठिकाण ठरलं आहे.  ९७ वे संमेलन जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे होणार आहे. (Akhil Bharatiya Sahitya Sammelan Amalner Maharashtra)

 

राज्यात साडेतीन महिन्यात लाच घेणारे 399 अधिकारी-कर्मचारी एसीबीच्या सापळ्यात

 

साहित्य महामंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या संमेलनासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि औदुंबर (जि. सांगली) खानदेशातील जळगाव जिल्ह्यात अमळनेर, तर मराठवाड्यातून जालना जिल्ह्यातील प्रस्ताव होता. यातून अमळनेरची निवड करण्यात आली. (Akhil Bharatiya Sahitya Sammelan Amalner Maharashtra)

 

 

 अमळनेर तालुक्याला साहित्य, संस्कृती, इतिहास, औद्योगिक विकास आणि सामर्थ्य अशी मोठी परंपरा आहे. त्यामुळे साऱ्यांच्या साक्षीने व सहकार्याने अमळनेर मराठी वाङ्मय मंडळ ९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची जबाबदारी घेतली आहे. (Akhil Bharatiya Sahitya Sammelan Amalner Maharashtra)

Local ad 1